Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोळंबी बिर्याणी बनवण्याची ‘ही’ हटके रेसिपी माहिती आहे का? खाणारे बोटं चाटत राहतील

भारतामध्ये अनेक माशांचे चाहते आहेत. देशात अनेक जणांना माश्यातील कोळंबी हा प्रकार आवडतो. बिर्याणी हा शब्द ऐकलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बिर्याणीचा प्रकारांमध्ये चिकन बिर्याणी आणि मटण बिर्याणी फार प्रसिद्ध आहे. परंतु, आज आपण या लेखातून कोळंबीपासून स्वादिष्ट बिर्याणी बनवायला शिकणार आहोत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 01, 2024 | 06:21 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात माशांसाठी वेडे असणाऱ्यांची कमी नाही आहे. भारतात अनेक ठिकाणी मासे मोठ्या स्वादाने खाल्ले जातात. खासकरून माशांची चव चाखण्यासाठी लोकं हजारो पैसे खर्च करून कोकणात किंवा गोव्यामध्ये फिरण्यास येतात. भारतात दोन प्रकारचे माशांचे चाहते आहेत. प्रथम ते ज्यांना गोड्या पाण्यातील मासे खाण्यास खूप आवडतात. भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये गोड्या पाण्याच्या माशांना मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. विशेषतः बंगाली भाषिक समूहातील लोकांमध्ये गोड्या पाण्यातील माशांना एक वेगळे स्थान आहे. माशांसाठी हृदयामध्ये स्पेशल जागा ठेवणाऱ्या लोकांचा दुसरा प्रकार म्हणजे खाऱ्या पाण्यातील माशांसाठी वेड बाळगणारी लोकं! भारताच्या पश्चिम तसेच दक्षिण भागात या प्रकारची माणसे खूप आहेत. यांना ‘सी फूड्स लव्हर्स’ असेही म्हंटले जाते.

हे देखील वाचा : कोकणातील प्रसिद्ध नाश्त्याचा पदार्थ: तांदळाच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार सात काप्याचे घावणे

जर तुम्हीदेखील सी फूड लव्हर्स आहात. तर ही रेसिपी तुम्हाला माशांच्या आणखीन प्रेमात पाडणार आहे. तर माशांच्या पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही माशांच्या प्रेमात पडा आणि लोकं तुमच्या हातची ही प्रॉन्स बिर्याणी खाऊन तुमच्या प्रेमात पडणार आहेत. चला तर मग बनवूया दर्याची राणी कोळंबी पासून हटके आणि स्वादिष्ट बिर्याणी:

साहित्य :

  • ३०० ग्रॅम कोळंबी
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल मिरची पावडर
  • १ टीस्पून मीठ
  • १ टीस्पून आले आणि लसूण पेस्ट
  • १/२ कप कांदा पेस्ट
  • १/४ टीस्पून गरम मसाला
  • १ कप दही
  • १/४ कप क्रीम
  • २ टेबलस्पून धणे
  • १/४ कप कांदा (तळलेला)
  • तळलेला १ कप तांदूळ (उकळलेले)
हे देखील वाचा : ग्रीन टी मध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, आरोग्यासंबंधित गंभीर समस्या होतील दूर

कृती:

  • हळद, तिखट, मीठ, आले, लसूण, कांदा, गरम मसाला आणि अर्धी वाटी दही मिक्स करून कोळंबीमध्ये घाला आणि त्याला मॅरीनेट करा.
  • तेल गरम करा आणि त्यात मॅरीनेट केलेले कोळंबी घाला. कोळंबीला जलद आचेवर तांबूस होईपर्यंत तळून घ्या.
  • याला आचेवरून काढून घेतल्यानंतर त्यामध्ये उरलेले दही, क्रीम, हिरवी कोथिंबीर आणि अर्धा तळलेला कांदा घाला.
  • एका पॅनमध्ये पृष्ठावर तेल लावून घ्या त्यावर थोडा उकळलेला भाताचा थर पसरावा.
  • पसरवलेल्या भाताच्या थरावर कोळंबीचा थर पसरावा. कोळंबीच्या पसरवलेल्या थरावर पुन्हा भाताचे थर पसरावा.
  • पॅनला झाकून घेऊन मध्यम आचेवर २० ते ३० मिनिटांसाठी शिजू द्या.
  • उरलेल्या फ्राईड कांद्याने डिश सजवून घ्या आणि गरमागरम सर्व करा.

Web Title: How to make delicious prawns biryani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 06:21 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.