तुपाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:
झोपेतून उठल्यानंतर अनेकांना सगळ्यात आधी ग्रीन टी पिण्याची सवय असते. ग्रीन टी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. आरोग्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असल्यामुळे अनेक लोक ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. तसेच सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी तुम्ही ग्रीन टी चे सेवन करू शकता. ग्रीन टी प्यायल्यामुळे आरोग्य सुधारते. ग्रीन टी मध्ये आढळून येणारे कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींपासून शरीराचे होणारे नुकसान टाळतात. तसेच ग्रीन टी मध्ये तुम्ही दालचिनी पावडर आणि तूप मिक्स करूनसुद्धा पिऊ शकता. आज आम्ही तुम्हाला ग्रीन टी मध्ये तूप आणि दालचिनी मिक्स करून प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
भारतीय मसाल्यांच्या पदार्थांमध्ये दालचिनीचा समावेश आहे. दालचिनीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. दालचिनीमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. शरीरात वाढलेली रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो. हृदयाच्या आरोग्यासाठी दालचिनी अतिशय गुणकारी आहे. दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराला आलेली सूज आणि वेदना कमी होतात.
हे देखील वाचा: तुम्ही करणार का No Pizza Challenge? एका महिन्यात शरीरात कमालीचा फरक, मिळतील 10 फायदे
तुपाचे सेवन केल्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचण्यास मदत होते. तसेच शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी तूप मदत करते. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही तुपाचा समावेश करू शकता. ऍसिडिटी किंवा पोतसबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात तुपाचे सेवन करावे. तुपामध्ये विटामिन के आणि ए आढळून येते, ज्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांनासुद्धा फायदे होतात.
हे देखील वाचा: नारळ तेलात मिक्स करा ज्युस, दुप्पट वाढतील केस






