सात काप्याचे घावणे रेसिपी
कोकणातील प्रत्येक घरात नाश्त्यासाठी सकाळी तांदळाच्या पिठापासून घावणे बनवले जातात. तांदळाच्या पिठापासून बनवलेले घावणे तुम्ही नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा खाऊ शकता. घावण्यांसोबत ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा चहासोबत सुद्धा तुम्ही हे घावणे खाऊ शकता. कोकणातील खाद्यपदार्थांमध्ये घावण्यांचा समावेश आहे. कोकणात घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा नाश्त्यामध्ये घावणे बनवून दिले जातात. कोकणातील घावणे जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. घावण्याचं नाव ऐकल्यानंतर सगळ्यांचंच तोंडाला पाणी सुटते. जीवनशैलीमध्ये बदल झाला असला तरीसुद्धा अजूनही कोकणातील प्रत्येक गावात अजूनही नाश्त्यासाठी घावणे बनवले जातात. तसेच सण उत्सवाच्या दिवसांमध्ये कोकणात सात काप्याचे गोड घावणे बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सात काप्याचे घावणे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही झटपट बनवू शकता.






