सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवग्याच्या शेंगांची चविष्ट भाजी
दैनंदिन आहारात शेवग्याच्या भाजीचे सेवन करावे. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर पोषक घटक शरीराला आवश्यक पोषण पुरवतात. अनेकदा सकाळच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणात काय भाजी बनवावी? हे सुचत नाही. नेहमीच भेंडी, तोंडली किंवा कडधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही नारळाचा किस आणि शेंगदाण्याचा कूट टाकून चविष्ट भाजी बनवू शकता. शेवग्याची भाजी खाणे हाडांसह संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या भाजीमध्ये बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर इत्यादी घटक आढळून येतात. शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहतो, तसेच शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नसांमधून बाहेर पडून जाते. शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेले विटामिन बी महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी ॲव्होकॅडो टोस्ट, नोट करून घ्या सिंपल रेसिपी
रामाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दुधी भोपळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या रेसिपी