गर्लफ्रेंड नाही म्हणून टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. आजच्या काळात रिलेशनशिपमध्ये असणं ही गरज वाटते, पण त्याहून महत्त्वाचं आहे स्वतःला ओळखणं आणि स्वतःवर प्रेम करणं. जर तुला खरंच एखादी चांगली गर्लफ्रेंड हवी असेल, तर त्यासाठी आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणं गरजेचं आहे. आज ‘गर्लफ्रेंड डे’ च्या निमित्ताने काही खास टिप्स सांगतोय ज्या तुझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात करू शकतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम कर. आत्मविश्वास वाढव, कारण आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीकडे लोक आपोआप आकर्षित होतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझं राहणीमान स्वच्छता, नीटनेटकेपणा, चांगले कपडे आणि एक चांगला परफ्युम यामुळे तुझं व्यक्तिमत्त्व उठून दिसेल. तिसरी गोष्ट म्हणजे, चांगला ऐकणारा हो. प्रत्येक मुलीला वाटतं की तिचं कुणीतरी ऐकावं, समजून घ्यावं. तू जर तिला समजून घेतलंस, तर तिचा विश्वास जिंकणं सोपं जाईल.
चौथं म्हणजे, हसतमुख राहा. सकारात्मकता आणि हास्य हे कोणत्याही नात्याचं सौंदर्य वाढवतं. पाचवी गोष्ट – तिच्या आवडी जाणून घे आणि त्या गोष्टींमध्ये खरा रस दाखव. सहावं दांभिकपणा करू नको. खोटं बोलून किंवा स्वतःला मोठं दाखवून काही साध्य होत नाही. प्रामाणिक राहणं हेच खरं आकर्षण आहे. सातवी टिप म्हणजे, ती तुझ्यावर विश्वास ठेवू शकेल असं वागणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता ठेऊन तिच्यासोबत सुसंवाद साध.
आठवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे, संयम ठेव. नातं घडायला वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो आणि प्रेमदेखील त्यातलंच एक. तु योग्य वागणं दाखवलंस तर प्रेम आपोआप येईल. शेवटी एवढंच गर्लफ्रेंड मिळवणं म्हणजे काही स्पर्धा नाही. ती योग्य वेळ आणि तुझ्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. त्यामुळे स्वतःला सतत सुधार, आत्मविश्वास ठेवा आणि नात्यांकडे जबाबदारीने पाहा यश नक्की मिळेल!