फोटो सौजन्य: iStock
नात्यातील गोडवा अजून वाढावा म्हणून आपण सगळेच काही स्पेशल दिवस साजरा करतो. जसे की मदर्स डे, फादर्स डे, सिबलिंग डे, आणि व्हॅलेंटाइन डे. मात्र, आज आपण अशा एका स्पेशल डे बद्दल जाणून घेणार आहोत, जो दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे नॅशनल गर्लफ्रेंड डे. ज्याला तुम्ही राष्ट्रीय प्रेयसी दिन असे सुद्धा म्हणू शकता.
आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्यातला एक महत्व असते. गर्लफ्रेंड हे त्यातीलच एक महत्वाचं आणि प्रेमळ नातं. आपल्या आयुष्यात गर्लफ्रेंड ही एक अशी व्यक्ती असते, जिला आपली आवड नावड ठाऊक असते, जिच्यासोबत आपण आपली सुख-दुःख शेअर करतो आणि जिच्यासोबत वेळ घालवला की जाणवते, आयुष्य किती सुंदर आहे. नात्यातील हाच गोडवा अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी National Girlfriend Day साजरा केला जातो.
गणेशमूर्तींचा बदलता साजशृंगार; बालगणेश, वारकरी अन् फेटे-पगड्यांनी सजलेल्या मूर्तींना वाढती मागणी
या स्पेशल दिवशी अनेक जण त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत महत्वाचा वेळ घालवतात, ते किती स्पेशल आहेत, याची जाणीव करून देतात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का हा दिवस का सुरू झाला आणि त्याचा नेमका अर्थ काय? चला जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी.
गर्लफ्रेंड डेच्या सुरुवातीची अधिकृत नोंद सापडत नाही, परंतु असे मानले जाते की या दिवसाची सुरुवात 2002 मध्ये Kathleen Laing आणि Elizabeth Butterfield यांनी केली होती. त्यांनी त्यांच्या “Girlfriends Getaway” या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी हा दिवस साजरा करण्याची आयडिया दिली. हळूहळू, हा दिवस सोशल मीडियावर आणि तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय झाला आणि आता तर तो एक ट्रेंड झाला आहे.
Friendship Breakup: ‘प्रयत्न बरे पण लाचारी नको!’ मैत्री तुटलेय मग आता काय करायचं? नक्की वाचा
गर्लफ्रेंड डे साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गर्लफ्रेंडबद्दलचे प्रेम, आदर आणि आपुलकी व्यक्त करणे. हा दिवस आपल्या आयुष्यात आधार, आनंद आणि आपुलकीची भूमिका बजावणाऱ्या सर्व स्त्रियांना समर्पित आहे. मग त्या गर्लफ्रेंड असोत, बहिणी असोत किंवा मैत्रिणी असोत.