संकष्टी चतुर्थीच्या नैवेद्यात बनवा आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक!
प्रत्येक महिन्यातून एकदा संकष्टी चतुर्थी येते. यादिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. याशिवाय संकष्टीच्या दिवशी गणपती मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. यादिवशी अनेक महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवास करून बाप्पाची मनोभावे पूजा केली जाये. संकष्टीच्या दिवशी अनेक घरांमध्ये मोदक बनवले जाते. याआधी तुम्ही उकडीचे मोदक, पुरणाचे मोदक, रव्याचे मोदक इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खाल्ले असतील मात्र आज आम्ही तुम्हाला आंब्याच्या रसातील चविष्ट मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबे खायला खूप आवडतात. चला तर जाणून घ्या आंब्याच्या रसातील मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)