कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये बनवा शरीर थंड राहण्यासाठी बनवा ताडगोळ्यांचे सरबत
उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. वाढत्या उन्हाळ्यात शरीरात निर्माण झाली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामध्ये ताक, दही, सरबत, नारळ पाणी किंवा इतर वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. याशिवाय उन्हाळ्यात वेगवेगळ्या फळांचे सेवन केले जाते. त्यात आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे ताडगोळे. ताडगोळे हे फळ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. ताडगोळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे कडक उन्हाळ्यात शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ताडगोळ्यांचे सेवन करावे. यामध्ये विटामिन सी, ए, विटामिन बी आणि ई इत्यादी अनेक जीवनसत्वे आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ताडगोळ्यांचे सरबत बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ताडगोळ्यांचे सरबत चवीला अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया ताडगोळ्यांचे सरबत बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
Muramba Recipe: कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट गोड मुरांबा; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी