Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशाप्रकारे घरच्या घरी तयार करा पिठी

गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दिवसांत गेणेशाला उकडीचे मोदक दाखवण्याचा मान असतो. मात्र नैवेद्यसाठी लागणारे उकडीचे मोदक तयार करणे फार सोपी गोष्ट नाही. अनेकदा योग्य तांदूळ आणि पिठी तयार न केल्यामुळे मोदक खराब होतात. तुम्हाला मऊसूत आणि उत्तम मोदक तयार करायचे असतील तर आजच यासाठीची योग्य पद्धत आणि योग्य तांदळाचा प्रकार जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2024 | 06:00 AM
24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशाप्रकारे घरच्या घरी तयार करा पिठी

24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशाप्रकारे घरच्या घरी तयार करा पिठी

Follow Us
Follow Us:

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या येण्याआधीच महिनाभरापासून त्याच्या आगमनाची तयारी सुरु होते. बाप्पाची आरास, मखर, सजावट यासर्वांची सुरुवात होते. तसेच यात बाप्पाला दाखवणाऱ्या नैवेद्याचीही लगबग सुरु असतेच. बाप्पाला नैवेद्यासाठी उकडीचा मोदक दाखवण्याची परंपरा आहे. बाप्पाला मोदक फार प्रिय असल्याचे म्हटले जाते. राज्यातील विविध भागात उकडीचा मोदक बनवण्याची पाककृती वेगवेगळी असू शकते.

मुळातच मोदक हा पदार्थ बनवणे फार कठीण आहे. फार अलगद आणि मन लावून मोदक बनवावा लागतो. याच्या काळ्या, सारण, कणिक प्रत्येकच गोष्ट योग्य असणे फार गरजचे असते. यात लहानशी जरी चूक झाली तरी मोदक खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी मोदक बनवण्यसाठीच्या काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत.

मोदक बनवण्यासाठी महत्तवाचा पदार्थ असतो तो म्हणजे तांदळाचे पीठ. एवढेच काय तर, मोदक बनवताना तुम्ही कोणते तांदूळ वापरत आहात हेदेखील फार महत्त्वाचे ठरते. कारण अनेकदा तांदूळ योग्य न घेतल्यानेही मोदक बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी मोदकासाठी तांदळाचे पीठ कसे तयार करावे ते जाणून घ्या.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक, झटपट तयार होणारी रेसिपी

मोदकासाठी कोणता तांदूळ घ्यावा?

सध्या बाजारात मोदकाचा विकतचे पीठ मिळते. मात्र हे पीठ तुम्ही घरोदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. यासाठी तांदूळ निवडताना तुम्हाला विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मोदकांसाठी तुम्ही तांदळामध्ये इंद्रायणी जुना वापरू शकता, मात्र या तांदळाचे मोदक थोडे चिकट बनतात. तसेच मोदकांसाठी आंबे मोहर हा तांदुळ सगळ्यात उत्तम आहे. या तांदळामुळे मोदक एकदम मऊ बनतात. तसेच याच्या वापराने मोदकांना चीरही पडत नाही. याचप्रमाणे, तुम्ही मोदकांसाठी सुवासिक बसमतीचादेखील वापर करू शकता. मात्र या तांदळाचे मोदक थोडेसे चिरण्याची शक्यता असते. कारण तो तांदुळ थोडा कोरडा असतो.

हा तांदूळ कधीही वापरू नये

आता मोदकांसाठी जसे कोणता तांदूळ योग्य आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे तितकेच हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे की कोणता तांदूळ कधीही वापरू नये. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोलम किंवा नवा तांदूळ मोदकांसाठी कधीही वापरू नये.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या

मोदकाचे पीठ कसे तयार करावे?

मोदकाचे पीठ घरी तयार करताना सर्वप्रथम तुम्ही कोणता तांदूळ वापरणार आहात, ते निश्चित करा. तांदूळ शक्यतो जुना असावा. तांदूळ निश्चित केल्यांनतर तांदूळ स्वछ पाण्याने चांगला धुवा. तांदूळ धुतल्यानंतर 15-20 मिनिटे चाळणीतून निथळून काढा. त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर हे धुतलेले तांदूळ नीट एकसमान पसरावा आणि तांदळांना चांगले सुकू द्या. तांदूळ चांगला कडकडीत सुकवा. शक्यतो फॅनखाली तांदुळ सुकवून घ्या. उन्हात सुकवल्यास तो अधिक कोरडा होण्याची शक्यता असते. ज्यामुळं मोदक चिरण्याची शक्यता असते. तांदूळ नीट सुकल्यानंतर त्याला दळून आणा.

Web Title: How to make modak flour at home easy tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2024
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Karisma Kapoor Fitness Secrets: 52 व्या वर्षीही करिश्माचा फिटनेस पाहण्यासारखा! न्यूट्रिशनिस्टने सांगितले खास मंत्र
1

Karisma Kapoor Fitness Secrets: 52 व्या वर्षीही करिश्माचा फिटनेस पाहण्यासारखा! न्यूट्रिशनिस्टने सांगितले खास मंत्र

Wadia Hospital Heart Transplant: १७ वर्षीय मुलाला मिळालं नवजीवन! वाडिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वी हृदय प्रत्यारोपण
2

Wadia Hospital Heart Transplant: १७ वर्षीय मुलाला मिळालं नवजीवन! वाडिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वी हृदय प्रत्यारोपण

Peepal Tree Removal Tips: भिंतीच्या भेगेत उगवलेला पिंपळ कसा काढाल? मिठाचा उपाय करण्याआधी ‘हे’ जाणून घ्या!
3

Peepal Tree Removal Tips: भिंतीच्या भेगेत उगवलेला पिंपळ कसा काढाल? मिठाचा उपाय करण्याआधी ‘हे’ जाणून घ्या!

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी
4

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.