१० मिनिटांमध्ये बनवा कांद्याचा कुरकुरीत डोसा
सकाळी उठल्यानंतर अजूनही अनेक घरांमध्ये साऊथ इंडियन नाश्त्याचे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतात. उत्तपम, मसाला डोसा, डोसा, इडली, मेदुवडे इत्यादी अनेकल पदार्थ बनवले जातात. तांदूळ आणि उडीद डाळीचे पीठ आंबवून साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. पण अनेकदा डोसा बनवण्यासाठी घरी तांदूळ भिजत घालायला विसरून जातो. अशावेळी तुम्ही १० मिनिटांमध्ये कांद्याचा कुरकुरीत डोसा बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. तसेच डोसा खाल्ल्यानंतर घरातील सगळे तुमचे कौतुक करतील. कांद्याचा वापर प्रामुख्याने फोडणी देण्यासाठी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला कांद्याचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही १० मिनिटांमध्ये बनवू शकता.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ग्रीन टीची चव आवडत नाही? ‘हे’ पदार्थ बनवतील तुमच्या चहाला आणखीन स्वादिष्ट