Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

जेवणाच्या ताटात जर भरलेली झणझणीत हिरवी मिरची असेल तर जेवणाची चव आणखीनच सुंदर लागते. त्यामुळे दुपारच्या जेवणात तुम्ही भरलेली मिरची बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 02:40 PM
गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

Follow Us
Follow Us:

रोजच्या जेवणात वरण भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. जेवणात भात आणि डाळ सगळेच खूप आवडीने खातात. डाळभातासोबत कोणती ना कोणती भाजी बनवली जाते. पण कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झणझणीत भरलेली मिरची बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. भरलेली हिरवी मिरची चवीला अतिशय सुंदर लागते. पदार्थाची चव वाढवण्यासाठी भरलेली मिरची हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. भरलेली मिरची बनवताना त्यात पाणी अजिबात टाकू नये. पाणी न टाकल्यामुळे पदार्थ ४ ते ५ दिवस व्यवस्थित टिकून राहतो. अनेक लोक भरलेली मिरची बनवताना त्यात खोबऱ्याचा वापर करतात तर काही वेगवेगळ्या डाळींच्या पिठाचा वापर करतात. यामुळे पदार्थाची चव चांगली लागते. चला तर जाणून घेऊया भरलेली हिरवी मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • हिरवी मिरची
  • शेंगदाण्याचा कूट
  • लाल तिखट
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • हळद
  • धणे जिरं पावडर
  • आमचूर पावडर
  • कोथिंबीर
  • तेल
खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • भरलेली हिरवी मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिरच्या स्वच्छ धुवून त्याच्या आतील बिया काढून मध्यभागी एक चीर पाडा.
  • मोठ्या वाटीमध्ये शेंगदाण्याचा कूट, बेसन, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, धणे जिरं पावडर, आमचूर पावडर, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात अजिबात पाणी घालू नये. यामुळे मिरच्या जास्त दिवस टिकून राहत नाही.
  • तयार केलेला मसाला हिरव्या मिरच्यांमध्ये भरगच्च भरून घ्या. तव्यावर तेल गरम करून त्यात हिंग घाला.
  • त्यानंतर पॅनवर हिरव्या मिरच्या ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भरलेली हिरवी मिरची.

Web Title: How to make stuff mirchi at home simple food recipe stuff mirchi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.