Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

Soyabin Mushroom Biryani Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत खास बनवायचा आहे मग यंदा ट्राय करा मशरुम सोयाबीन बिर्याणी. यासाठी आपण बेसिक साहित्यांचा वापर करणार आहोत पण याची चव मात्र कुटुंबाला नक्कीच खुश करणारी ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2026 | 11:01 AM
Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा मशरुम-सोयाबीन बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा मशरुम-सोयाबीन बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • बिर्याणी अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे.
  • आज आपण सोयाबीन मशरुम बिर्याणीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
  • ही रेसिपी कुटुंबासोबत चाखा, त्यांना नक्कीच याची चव खूप आवडेल.
रात्रीचे जेवण हे अनेकांच्या घरात खास छरत असते, कारण हिच ती वेळ असते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करतात. यात गप्पागोष्टी रंगतात आणि जेवणाचा निवांत आनंद लुटला जातो. नेहमीची भाजी-चपाती खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि नवीन टेस्टी खाण्याची इच्छा असेल तर मशरुम सोयाबीन बिर्याणी तुमच्यासाठी परफेक्ट ठरु शकते. बिर्याणी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे, आपण चिकन, पनीर बिर्याणी तर अनेकदा खातो पण यावेळी काहीतरी हटके ट्राय करा. ही बिर्याणी काही साध्या साहित्यांपासून तयार केली जाते पण याची चव मात्र भन्नाट लागते. चला नोट करुन घेऊयात रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

साहित्य

  • ६० ग्रॅम सोया चंक्स
  • १५-१८ चिरलेले मशरूम
  • ३०० ग्रॅम स्कीवर्स
  • २ एअर-फ्राईड कांदे
  • चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना
  • १ मोठा चमचा बिर्याणी मसाला
  • १ मोठा चमचा कसुरी मेथी
  • १ छोटा चमचा लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • हिरवी मिरची-लसूण पेस्ट
  • चवीनुसार लिंबाचा रस
  • १ मोठा चमचा गूळ पावडर
भातासाठी लागणारे साहित्य:
  • ८५ ग्रॅम बासमती तांदूळ
  • १ दालचिनी
  • ३-४ काळी मिरी
  • १ छोटा चमचा तूप
  • चिमूटभर मीठ
थर लावण्यासाठी लागणारे साहित्य:
  • ९०% शिजलेला ब्राऊन बासमती तांदूळ
  • ताजा पुदिना
  • केशर घातलेले ३०-३५ मिली दूध
संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

कृती

  • यासाठी सर्वप्रथम सोयाबीन साधारण १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • दुसरीकडे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरुन घ्या.
  • चिरलेला कांदा तेलात ब्राऊन रंग येईपर्यंत तळा.
  • आता एका भांड्यात तळलेला कुरकुरीत कांदा, सोया चंक्स, मशरूम, भाजलेले कांदे, चिरलेली कोथिंबीर आणि
  • पुदिन्याची पाने, बिर्याणी मसाला, कसुरी मेथी, लाल तिखट, मीठ, हिरवी मिरची-लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि गूळ पावडर एकत्र करुन साहित्य अर्धा तास मॅरिनेट करा.
  • दुसऱ्या कढईत बासमती तांदूळ, दालचिनी, काळी मिरी, १ चमचा तूप आणि चिमूटभर मीठ घालून भाताला ९०% शिजवून घ्या आणि बाजूला ठेवा.
  • आता पुन्हा एकदा कढईत तेल गरम करा आणि यात मॅरिनेट केलेले मिश्रण घालून १०-१५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवत ठेवा.
  • सोया-मशरूमच्या मिश्रणावर ९०% शिजलेल्या भाताचा थर लावा. त्यावर उरलेले तळलेले कांदे, ताजी पुदिना आणि केशराचे दूध घाला.
  • झाकण बंद करुन मंद आचेवर बिर्याणीला छान शिजू द्या. १० ते १५ मिनिटे मंद आचेवर शिजवल्यानंतर तुम्ही गॅस बंद करु शकता.
  • लक्षात घ्या, बिर्याणी तयार झाल्यानंतर लगेच झाकण उघडू नका तर साधरण ५ मिनिटांनी झाकण खोलून तयार बिर्याणी खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • रायत्यासोबत किंवा कोशिंबीरसोबत ही बिर्याणी चवीला अप्रतिम लागेल.

Web Title: How to make soyabin mushroom biryani nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • biryani
  • dum biryani
  • marathi recipe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.