
गव्हाच्या पिठापासून बनवा उकडीचे चविष्ट गोड मोदक
गणपती बाप्पाला उकडीचे मोदक खूप आवडतात, असे मानले जाते. बाप्पाच्या नैवेद्यासाठी सगळ्यात आधी उकडीचे मोदक बनवले जातात. बाप्पाचे लवकरच आगमन होणार असल्यामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पा आल्यानंतर प्रसादासाठी अनेक वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. खीर, वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक, बासुंदी, श्रीखंड इत्यादी अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. पण काहींना तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवता येत नाही. काहींना तांदळाची उकड बनवता येत नाही तर काही मोदकांच्या पाऱ्या बनवता येत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे याची सोपी कृती सांगणार आहोत. हे मोदक तुम्ही झटपट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मोदक बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य-istock)