Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा ‘गव्हाचे सामोसे’, कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी

Wheat Samosa Recipe : आरोग्य आणि चव यांचा सुंदर संगम म्हणजे गव्हाच्या पिठाचे समोसे. आजच्या पार्टीत एक टेस्टी पण हेल्दी असा स्नॅक्स शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 31, 2025 | 10:20 AM
मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा 'गव्हाचे सामोसे', कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी

मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा 'गव्हाचे सामोसे', कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • गव्हाच्या पिठाचे समोसे मैद्याच्या समोशांपेक्षा हलके, फायबरयुक्त आणि पचनासाठी अधिक चांगले असतात.
  • योग्य मसाले आणि सारणामुळे हे समोसे बाहेरून खुसखुशीत व आतून मऊ-चविष्ट लागतात.
  • कमी तेलात किंवा एअर फ्रायरमध्येही हे हेल्दी समोसे सहज तयार करता येतात.

समोसा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. चहा, पावसाळा आणि गरमागरम समोसा यांचं नातं फारच खास आहे. पण पारंपरिक समोसे मैद्यापासून बनवले जात असल्याने ते जड वाटू शकतात आणि रोजच्या आहारासाठी फारसे आरोग्यदायी नसतात. म्हणूनच आजकाल अनेक जण हेल्दी पर्यायांचा विचार करत आहेत. गव्हाच्या पिठाचे समोसे हा त्याचाच एक उत्तम पर्याय आहे.

Winter Special Recipe: हिवाळ्यात घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट पंजाबी स्टाईल ‘आलू पराठे’

गव्हाचं पीठ फायबरयुक्त असल्यामुळे पचनासाठी चांगलं असतं आणि पोट भरल्याची भावना लवकर मिळते. त्यामुळे वजनाची काळजी घेणाऱ्यांसाठीही हे समोसे उत्तम ठरतात. चवीच्या बाबतीतही गव्हाच्या पिठाचे समोसे पारंपरिक समोशांपेक्षा कमी नाहीत. योग्य मसाले, चांगली सारण आणि योग्य तापमानात तळल्यास हे समोसे बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ व चविष्ट लागतात.

घरात आलेले पाहुणे असोत, संध्याकाळचा नाश्ता असो किंवा एखादा खास प्रसंग असल्यास गव्हाच्या पिठाचे समोसे सर्वांनाच खुश करतील. विशेष म्हणजे हे समोसे आपण कमी तेलात किंवा एअर फ्रायरमध्येही बनवू शकतो. चला तर मग पाहूया, घरीच सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे हेल्दी आणि स्वादिष्ट समोसे कसे तयार करायचे. सोपी रेसिपी नोट करा.

साहित्य

बाहेरील आवरणासाठी:

  • गव्हाचे पीठ – 2 कप
  • मीठ – चवीनुसार
  • ओवा – ½ टीस्पून
  • तेल/तूप – 3 टेबलस्पून
  • पाणी – मळण्यासाठी
सारणासाठी:
  • उकडलेले बटाटे – 3 ते 4
  • हिरवे वाटाणे – ½ कप
  • तेल – 2 टेबलस्पून
  • जिरे – 1 टीस्पून
  • आलं-हिरवी मिरची पेस्ट – 1 टीस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
31st Party Special : वर्षाचा शेवट करा रंगतदार! बाहेरून कशाला आता तंदूरशिवाय घरीच बनवा ‘स्मोकी तंदुरी चिकन’

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ, ओवा आणि तेल घालून चांगले मिसळा.
  • थोडेथोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या आणि झाकून 15–20 मिनिटे ठेवा.
  • दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की आलं-मिरची पेस्ट घाला.
  • त्यात वाटाणे, बटाटे आणि सर्व कोरडे मसाले घालून चांगले परता. शेवटी कोथिंबीर घालून सारण थंड होऊ द्या.
  • पीठाच्या मध्यम आकाराच्या पोळ्या लाटा, त्या अर्ध्या कापा आणि कोन तयार करा.
  • त्या कोनामध्ये तयार सारण भरा आणि कडा पाण्याने चिकटवून समोसा बंद करा.
  • कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून समोसे मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
  • गरमागरम गव्हाच्या पिठाचे समोसे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
  • अधिक हेल्दी पर्यायासाठी हे समोसे एअर फ्रायरमध्येही शिजवले जाऊ शकतात.
  • हे लक्षात ठेवा की सामोसे हे नेहमी मंद आचेवर तळावे तेव्हाच ते खुसखुशीत बनतात.

Web Title: How to make wheat samosa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Samosa
  • samosa recipe

संबंधित बातम्या

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
1

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
2

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
3

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर
4

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.