
दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? 'या' सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
डिजिटल जग लहान मुलांन करतंय कंट्रोल
संशोधन सांगते की, मोबाईलचा सततचा वापर लहान मुलांच्या आनंदावर आणि त्यांच्या सवयींवर वाईट परिणाम करतो. यामुळे मेंदूत डोपामाइन नावाचे हॉर्मोन तयार होते. ही प्रक्रिया हातातून फोन काढून घेतल्याने तुटते ज्यामुळे मुलं अस्वस्थ होतात, त्यांच्यातील निराशा वाढते आणि ते चिडचिड करु लागतात. यामुळेच रागाच्या भरात मुलांच्या हातून फोन हिसकावण्याआधी प्रेमाने त्यांना कोणत्या तरी दुसऱ्या कामांत गुतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे मुलांना कोणताही दबाव जाणवणार नाही आणि स्वमर्जीने ते फोनचा वापर कमी करतील.
मैदानी खेळांमध्ये मुलांना गुंतवा
पूर्वाच्या काळी जेव्हा मोबाईल फोन्स नव्हते तेव्हा मुलं मैदानी खेळांमध्ये अधिक रमत होती. यामुळे मुलांची शारीरिक वाढही चांगली होते, ज्यामुळे मैदानी खेळ त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. मुलांना आपल्या लहानपणीचे मैदानी खेळ शिकवा आणि थोडा वेळ त्यांच्यासोबत हे खेळ खेळा. त्यांना सायकलिंग करायला द्या. रोजच्या जीवनात थोडा वेळ मुलांसाठी काढून त्यांच्यासोबत हे खेळ आपुलकीने खेळा आणि याचे महत्त्व त्यांना पटवून द्या. यामुळे आपोआपच ते खेळात रमतील आणि फोनचा वापर कमी करतील.
कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
ओरडू नका, समजावून सांगा
लहान मुलांचा स्वभाव असतो की, त्यांना जे करण्यासाठी मनाई केली जाते, मुलं तेच काम पहिले करायला जातात. तुमचा ओरडा त्यांच्या मनावर वाईट परिणाम करु शकतो. यामुळे त्यांच्या मनात तुमच्याप्रती द्वेष निर्माण होईल आणि तुमच्या नात्यात दुरावाही येईल. म्हणूनच मुलांना ओरडून सांगण्याऐवजी एका मित्राप्रमाणे त्यांना गोष्ट समजावून सांगा. त्यांच्यासोबत संवाद साधा आणि दुसऱ्या कलाकुसरीच्या गोष्टीत जसे की, चित्रकला, पाॅटरी, गायन, नृत्य, DIY आर्ट यात त्यांना रमवून ठेवण्याचा प्रयत्न करा . यामुळे त्यांच्या वेळही वाया जाणार नाही आणि काही चांगले काैशल्य त्यांच्या अंगी लागतील.