केस धुतल्यानंतर 'अशा' पद्धतीने घ्या केसांची काळजी
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. सर्वच महिला आणि पुरुषांचे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळू नये म्हणून अनेक उपाय केले जातात. केमिकल ट्रीटमेंट, घरगुती उपाय , आयुर्वेदिक उपाय इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण या सर्व गोष्टी करून सुद्धा केस गळती थांबत नाही. केसांची योग्यरित्या काळजी घेतली नाहीतर केस खराब होऊ लागतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केस स्वच्छ धुतले पाहिजेत. केसांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यानंतर केस मजबूत आणि घनदाट होतात. पण आपल्या लहान लहान चुकांमुळे केस गळण्यास सुरुवात होते.
धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे केस खराब किंवा कोरडे होऊन जातात. के कोरडे किंवा निस्तेज झाल्यानंतर केसांचे सौंदर्या पूर्णपणे बिघडून जाते. यासाठी काही महिला केमिकल तर काही महिला घरगुती उपाय करतात. पण या उपायांमुळे काही वेळा केस अजून जास्त गळू लागतात. अंघोळ केल्यानंतर किंवा इतर वेळा केस सगळीकडे पसरलेले असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला योग्य प्रकारे केसांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
केसांची काळजी घेण्यासाठी केस आठवड्यातून दोन वेळा स्वच्छ धुतले पाहिजे. यामुळे केसांमध्ये कोंडा किंवा टाळूवर इन्फेक्शन होत नाही. केस धुतल्यानंतर शॅम्पू केल्यावर केसांना कंडिशनर लावायला विसरू नका. नियमित कंडिशनरचा वापर करावा. केस धुतल्यानंतर कंडिशनर लावल्यामुळे केस चमकदार आणि सुंदर दिसतात. तसेच केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होते.
हे देखील वाचा: तुम्हालाही सतत चेहरा धुण्याची सवय आहे? गंभीर परिणाम होऊ शकतात, आजच जाणून घ्या
केस धुवण्याच्या आधी आणि केस धुतल्यानंतर केसांमधील गुंता व्यवस्थित सोडवून घ्या. शक्यतो कंगव्याने केस विंचरावे. केसांमधील गुंता वेळीच सोडवल्यामुळे केसांमध्ये गुंता जास्त वेळ टिकून राहत नाही. तसेच तुमचे केस एकमेकांमध्ये अडकून तुटू नये यासाठी केसांची योग्य ती काळजी घ्यावी.
केसांच्या मजबूत आणि घनदाट वाढीसाठी हेअर सीरम खूप महत्वाचे आहे. यामुळे केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहते. केसांना योग्य पद्धतीने हेअर सीरम लावल्यास केस छान आणि सुंदर दिसतात. केसांना पोषण देण्याचे काम हेअर सीरम करते.
हे देखील वाचा: हे 5 पदार्थ मासिक पाळीच्या दुखण्यापासून देतात आराम
केसांच्या मजबूत आणि घनदाट वाढीसाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेल लावल्यामुळे केसांच्या मुळांमध्ये रक्तभिसरण व्यवस्थित होऊन केसांची वाढ होण्यास मदत होते . कोरड्या केसांवर खोबरेल तेल लावल्यामुळे केस मऊ आणि सिल्की होतात.