Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घेणार? ऍलर्जी होण्याचे प्रकार आणि कारणे कोणती? जाणून घ्या उपचार

त्वचेची अ‍ॅलर्जी विविध कारणांनी होऊ शकते आणि ती वेळेवर ओळखून योग्य उपचार न केल्यास गंभीर रूप धारण करू शकते. ट्रिगर्स टाळणे, स्वच्छता राखणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे उपचार आणि प्रतिबंधासाठी महत्त्वाचे आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 11, 2025 | 05:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

त्वचेची अ‍ॅलर्जी ही केवळ खाज सुटणे एवढ्यापुरती मर्यादित नसते. अनेकदा यामुळे त्वचेला सूज, लालसरपणा, पुरळ, फोड किंवा जळजळ होऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये त्वचेसंबंधी आजार, संसर्ग, डाग आणि असह्य वेदनाही होऊ शकतात. अ‍ॅलर्जीचे मूळ कारण ओळखून योग्य उपचार न केल्यास ती दीर्घकाळ राहू शकते. म्हणूनच अ‍ॅलर्जीच्या प्रकारांबद्दल, कारणांबद्दल आणि योग्य व्यवस्थापनाबद्दल माहिती असणे महत्त्वाचे ठरते. संबंधित माहिती त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी पुरवली आहे.

चिकन कोरमा तर बऱ्याचदा खाल्ला असेल पण कधी फणसाचा कोरमा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

त्वचेची अ‍ॅलर्जी अनेक प्रकारची असते. कॉन्टॅक्ट डर्माटायटीस ही सर्वाधिक सामान्य अ‍ॅलर्जी असून, यात त्वचा विशिष्ट घटकांच्या संपर्कात आल्यावर प्रतिक्रिया देते. उदाहरणार्थ – डिटर्जंट, साबण, परफ्युम, धातू किंवा रंग. दुसऱ्या प्रकारात एक्झिमा, अर्टिकेरिया (पित्त उठणे), अँजिओएडेमा (त्वचेखाली सूज) आणि एटोपिक डर्माटायटीस यांचा समावेश होतो. या अ‍ॅलर्जीत त्वचा कोरडी, जळजळ होणारी आणि अतिशय संवेदनशील होते, त्यामुळे दैनंदिन कामे देखील कठीण होतात.

अ‍ॅलर्जीची कारणेही अनेक असू शकतात. काहींना कृत्रिम कपडे, परागकण, धूळ, पाळीव प्राण्यांचे केस, बुरशी, कीटक चावणे यामुळे त्रास होतो. सौंदर्य प्रसाधनांतील रसायनांमुळे देखील त्वचेला त्रास होतो. काही लोकांना विशिष्ट अन्नपदार्थ, जसे की सुकामेवा, दूध, अंडी किंवा सीफूड यामुळे अ‍ॅलर्जी होते. काहींना उन्हात जास्त वेळ घालवल्याने, तापमानातील अचानक बदलामुळे किंवा मानसिक तणावामुळे देखील त्वचेवर परिणाम होतो.

दुष्परिणामांमध्ये तीव्र खाज, वेदना, त्वचेवर काळसर डाग, सूज किंवा फोडांचा समावेश होतो. वेळेत उपचार न केल्यास अ‍ॅलर्जीक ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ शकतो. सौम्य अ‍ॅलर्जीसाठी डॉक्टरांनी सुचवलेले मॉइश्चरायझर आणि अँटी-हिस्टॅमिन औषधे उपयोगी ठरतात. तीव्र अ‍ॅलर्जीसाठी कॉर्टिकोस्टेरॉईड क्रीम्स किंवा ओरल औषधे आवश्यक असतात.

जया बच्चन ‘या’ आजाराला ग्रस्त; पापाराझींवर चिडण्याचे हेच कारण? श्वेता बच्चनने केला खुलासा…

अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओळखलेले ट्रिगर्स, जसे विशिष्ट खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, धूळ किंवा परफ्युम यांचा टाळता येईल तितका टाळावा. त्वचा नेहमी स्वच्छ ठेवणे, सौम्य स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरणे, पाणी भरपूर पिणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे यामुळे अ‍ॅलर्जीवर नियंत्रण ठेवता येते. दीर्घकाळ त्रास होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. योग्य वेळेवर निदान आणि उपचार केल्यास त्वचेची अ‍ॅलर्जी नियंत्रित करता येते आणि आरोग्यपूर्ण जीवन जगता येते.

Web Title: How to take care of your skin in summer what are the types and causes of allergies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • ahealth news
  • daily health

संबंधित बातम्या

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…
1

सिगारेट, दारू की भांग, कोणती नशा तुम्हाला सर्वात पहिले पोहचवेल यमाच्या दारी? तज्ञ म्हणतात…

दिर्घायुषी व्हायचंय ? मग ‘या’ भाज्या दर आठवड्याला खायलाच पाहिजे
2

दिर्घायुषी व्हायचंय ? मग ‘या’ भाज्या दर आठवड्याला खायलाच पाहिजे

वेळेवर निदान हाच उपाय! HIV ची सुरुवात, लक्षणं आणि बचाव; जाणून घ्या
3

वेळेवर निदान हाच उपाय! HIV ची सुरुवात, लक्षणं आणि बचाव; जाणून घ्या

आई वडिलांना मधुमेह आहे? आतापासूनच राहा सावधान! पण का?… वाचा
4

आई वडिलांना मधुमेह आहे? आतापासूनच राहा सावधान! पण का?… वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.