(फोटो सौजन्य - अकाउंट)
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी ‘गुड्डी’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी शोले, बावर्ची, अभिमान, दिल दीवाना, कोरा कागज, सिलसिला, कभी खुशी कभी गम अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जया बच्चन सध्या त्यांच्या सतत रागावलेल्या व्यक्तिमत्वासाठी चर्चेत आहे. अभिनेत्री नेहमीच सार्वजनिक ठिकाणी लोकांवर रागवताना दिसत असते. लोकांना प्रश्न पडतो की जया बच्चन इतक्या रागीट का आहेत? परंतु आता याचदरम्यान त्यांची मुलगी श्वेता बच्चनने याबाबत एक खुलासा केला आहे, की अभिनेत्री असा का करते. चला तर मग जाणून घेऊयात.
‘आज की रात’नंतर तमन्ना भाटियाचा ‘नशा’मध्ये हॉट डान्सिंग मूव्हज, ‘रेड २’ मधील जबरदस्त गाणं रिलीज!
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन अनेकदा पापाराझी किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांवर रागावताना दिसल्या आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात जया बच्चन पापाराझींवर राग काढताना दिसत आहेत. एकदा श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये सहभागी झाले होते आणि करणने त्यांना जया बच्चनच्या अशा व्हिडिओंवर त्यांची प्रतिक्रिया विचारली. ज्याला उत्तर देताना, अभिनेत्रीची मुलगी श्वेता बच्चनने गर्दी पाहून जया बच्चन का रागावतात हे उघड केले होते. आता त्यांचे रागवण्याचे कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
करण जोहरच्या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेक बच्चन गमतीने म्हणाला की जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपण शांतपणे प्रार्थना करतो की तिथे पापाराझी नसावेत. त्यानंतर श्वेता बच्चन पुढे म्हणाली की जेव्हा तिची आई जया बच्चन अनेक लोकांमध्ये असते तेव्हा तिला गुदमरल्यासारखे वाटू लागते. गर्दी पाहून ती अचानक थोडी काळजीत पडते. श्वेताने असेही म्हटले की तिच्या आईलाही कोणीही न विचारता तिचे फोटो काढणे आवडत नाही. त्यामुळे त्यांची सार्वजनिक ठिकाणी चिडचिड होते. आणि त्या प्रत्येक व्हिडीओमध्ये संतापलेल्या दिसतात.
पाकिस्तानात करीना कपूरची हजेरी ? रेव्ह पार्टीतील Viral Video ने सर्वांना केले थक्क!
शोमध्ये श्वेता बच्चनने असेही सांगितले की तिची आई जया बच्चनला गर्दीच्या ठिकाणी जाणे आवडत नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा ती कुठेतरी दिसते आणि पापाराझी किंवा छायाचित्रकार तिच्या मागे येऊ लागतात तेव्हा ती रागावते आणि त्यांच्यावर ओरडू लागते. जया बच्चन गेल्या ६ दशकांपासून चित्रपटसृष्टीचा एक भाग आहेत. त्यांनी १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महानगर’ या बंगाली चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली, तिचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गुड्डी’ होता. यानंतर अभिनेत्रीने अनेक चित्रपट केले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले.