Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्रकिनारा हवा तर गोवा कशाला? या शहरात बनत आहे भव्य आर्टिफिशियल बीच, २२५ कोटींचा मेगा प्रोजेक्ट

Artificial Beach : हैदराबादमध्ये लवकरच ३५ एकरात भव्य आर्टिफिशियल बीच उभारला जाणार आहे. २२५ कोटींच्या या प्रकल्पात वेव्ह पूल, फ्लोटिंग व्हिला, लक्झरी हॉटेल्स आणि अनेक मनोरंजन सुविधा असतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2026 | 08:34 AM
समुद्रकिनारा हवा तर गोवा कशाला? या शहरात बनत आहे भव्य आर्टिफिशियल बीच, २२५ कोटींचा मेगा प्रोजेक्ट

समुद्रकिनारा हवा तर गोवा कशाला? या शहरात बनत आहे भव्य आर्टिफिशियल बीच, २२५ कोटींचा मेगा प्रोजेक्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • समुद्रकिनारा कुणाला आवडत नाही, शांत वातावरण, पाण्याचा प्रवाह मनाला शांती देऊन जातो.
  • समुद्रकिनारा म्हटलं की आपल्याला सर्वात आधी गोव्याची आठवण येते.
  • पण तुम्हाला माहिती आहे का? भारताच्या एका शहरात आता आर्टिफिशियल बीच बनवण्याचे काम सुरु होणार आहे.
हैदराबादमध्ये राहणाऱ्यांसाठी आणि समुद्रकिनाऱ्याचा अनुभव घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बीचचा आनंद घेण्यासाठी गोवा किंवा केरळला जाण्याची गरज भासणार नाही, कारण हैदराबादमध्येच एक भव्य कृत्रिम समुद्रकिनारा (आर्टिफिशियल बीच) उभारण्यात येणार आहे. तेलंगणा सरकार हैदराबादच्या कोटवाल गुडा परिसरात, बाह्य रिंग रोडजवळ, हा अत्याधुनिक प्रकल्प साकारत आहे. सुमारे ३५ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या प्रकल्पात एक मोठी मानवनिर्मित तलावही तयार करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पावर अंदाजे २२५ कोटी रुपयांचा खर्च होणार असून, तो पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मॉडेलवर विकसित केला जाणार आहे.

हे आहे जगातील शेवटचे गाव; इथे नाही मरण्याची परवानगी… नेहमीच असतो रात्रीचा अंधार

सरकारच्या मते, हा आर्टिफिशियल बीच हैदराबादसाठी एक नवे पर्यटन आकर्षण ठरेल. येथे केवळ वाळू आणि पाणीच नाही, तर पर्यटकांसाठी संपूर्ण मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध असेल. या प्रकल्पात फ्लोटिंग व्हिला, लक्झरी हॉटेल्स, वेव्ह पूल, बंजी जंपिंग, सेलिंग व स्केटिंग सुविधा, सायकलिंग ट्रॅक, मुलांसाठी पार्क आणि खेळाची मैदाने, फूड कोर्ट्स व कॅफे, थिएटर तसेच म्युझिकल फाउंटन अशा अनेक आकर्षक सुविधा असतील. त्यामुळे कुटुंबासोबत वीकेंड घालवण्यासाठी हे ठिकाण एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल.

रोजच आयुष्य सोपं करतात संविधानातील ‘हे’ अधिकार, अनेकांना नावंही ठाऊक नाही; 26 जानेवारीला ओळखा तुमची खरी ताकद

कोटवाल गुडा परिसराची निवड यासाठी करण्यात आली आहे कारण तो बाह्य रिंग रोडजवळ असल्याने येथे पोहोचणे सोपे आहे. याशिवाय, प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान पर्यावरण संरक्षणालाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तेलंगणा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष पटेल रमेश रेड्डी यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पाची डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तेलंगणा राज्यात पर्यटन विकासासाठी मोठी संधी असल्याचे सरकारचे मत असून, हा आर्टिफिशियल बीच प्रकल्प राज्याच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला नवी चालना देईल. स्थानिक नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांनाही हा प्रकल्प आकर्षित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title: Hyderabad mega artificial beach project 225 crore travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • Beach
  • Hyderabad
  • travel news

संबंधित बातम्या

हे आहे जगातील शेवटचे गाव; इथे नाही मरण्याची परवानगी… नेहमीच असतो रात्रीचा अंधार
1

हे आहे जगातील शेवटचे गाव; इथे नाही मरण्याची परवानगी… नेहमीच असतो रात्रीचा अंधार

नारळी बागा, शांत लाटा आणि स्वर्गसुख… हिवाळ्यात कोकणातील ‘या’ निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची पर्यटकांना भुरळ
2

नारळी बागा, शांत लाटा आणि स्वर्गसुख… हिवाळ्यात कोकणातील ‘या’ निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची पर्यटकांना भुरळ

फिरण्याचे शौकीन आहात? मग Travel Insurance चे फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत…
3

फिरण्याचे शौकीन आहात? मग Travel Insurance चे फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत…

250 वर्षे जुने आहे देवी तारा मातेचे ‘हे’ मंदिर, गुप्त नवरात्रीत केले जातात अनुष्ठान
4

250 वर्षे जुने आहे देवी तारा मातेचे ‘हे’ मंदिर, गुप्त नवरात्रीत केले जातात अनुष्ठान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.