
आजकाल बदलती जीवनशैली (Lifestyle) आणि आहार यामुळे बहुतांश लोक लठ्ठ होत आहेत. एकदा वजन वाढले की अनेक उपाय करूनही ते लवकर कमी होत नाही. वजन वाढल्याने (Weight) अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पण असे काही ज्यूस देखील आहेत ज्यांच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. कारण या रसांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया या ज्यूसबद्दल जे वजन कमी करण्यास मदत करतात.