Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम

जास्त वजन दिसायला सामान्य वाटू शकते, पण आतून शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. नुकताच जागतिक स्थूलता दिन साजरा करण्यात आला. जाडी वाढत असेल तर हा लेख नक्की वाचाच

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 05, 2026 | 09:15 PM
भारतात वाढतेय वजन वाढण्याची समस्या (फोटो सौजन्य - iStock)

भारतात वाढतेय वजन वाढण्याची समस्या (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • वजन वाढतंय काय आहे कारण?
  • वजन वाढल्यामुळे शरीरावर काय होतो परिणाम
  • काय सांगतात तज्ज्ञ 
जास्त वजनामुळे मधुमेह, हृदयविकार, फॅटी लिव्हर आणि हार्मोनल असंतुलन यांचा धोका वाढतो. नियमित हेल्थ चेक-अप केल्याने आजार लवकर ओळखता येतात आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते. त्यामुळे जर तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही स्थूल  असाल, तर तज्ज्ञांच्या संपर्कात राहणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे योग्य पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. खालील महत्त्वाच्या टिप्सनुसार स्थूलतेवर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

भारतामध्ये स्थूलतेची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अनेक जास्त वजन असलेल्या व्यक्तींना स्वतःला ठणठणीत वाटते आणि ते स्वतःला निरोगी समजतात. मात्र, शरीरातील अतिरिक्त चरबी हृदय, यकृत (लिव्हर) आणि स्वादुपिंड (पॅनक्रियास) यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करू शकते. तुम्हाला माहिती आहे का? मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, थायरॉईड असंतुलन आणि व्हिटॅमिनची कमतरता हे आजार सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणांशिवाय विकसित होऊ शकतात. डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे.  म्हणूनच जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. नियमित रक्त तपासण्या केल्याने स्थूलतेमुळे निर्माण होणाऱ्या लपलेल्या समस्या ओळखता येतात आणि त्यावर वेळेवर उपचार करता येतात. महत्त्वाच्या तपासण्या ज्या दुर्लक्षित करू नयेत. 

World Obesity Day 2026: शेकडो आजारांचे मूळ आहे लठ्ठपणा, शरीर सडवण्यापासून अटॅक येण्यापर्यंत त्रास; वेळीच करा वजन कमी

HbA1c (रक्तातील साखरेची तपासणी): 

ही तपासणी मागील तीन महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेचे प्रमाण दर्शवते. जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स आणि टाइप २ मधुमेहाचा धोका जास्त असतो. HbA1c वाढलेले असल्यास लक्षणे दिसण्यापूर्वीच प्रीडायबेटीस किंवा मधुमेहाची शक्यता कळू शकते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी ही तपासणी करणे योग्य ठरते.

लिपिड प्रोफाइल:

या तपासणीत LDL (वाईट कोलेस्ट्रॉल), HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण तपासले जाते. स्थूलतेमुळे वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढतात, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.

लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT):

जास्त वजनामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. LFT द्वारे यकृताचे आरोग्य तपासता येते आणि चरबी साचल्यामुळे होणारे सुरुवातीचे नुकसान ओळखता येते.

थायरॉईड फंक्शन टेस्ट:

थायरॉईड हार्मोन्स शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रित करतात. थायरॉईड कमी कार्यरत असल्यास (हायपोथायरॉईडीझम) वजन वाढणे, थकवा आणि मेटाबॉलिझम मंदावणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे थायरॉईड तपासणी नियमितपणे करणे आवश्यक आहे.

जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात ‘हे’ गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान

व्हिटॅमिन डी पातळी:

जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. यामुळे सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात व मानसिक ताण वाढू शकतो.

स्थूलतेकडे दुर्लक्ष करू नका  वेळीच योग्य पावले उचला. नियमित तपासण्यांसोबतच ताज्या फळे आणि भाज्यांनी समृद्ध पौष्टिक आहार घ्या, गरज असल्यास व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या, पुरेशी झोप घ्या आणि दररोज  व्यायाम करा. वजन कमी करण्यासाठी आणि स्थूलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे.वेळेवर तपासणी, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे मोठे आजार टाळता येतात. आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्याची काळजी घ्या.

Web Title: Overweight obesity issue why is regular health check up necessary the body is rotting from within serious consequences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lose weight
  • obesity

संबंधित बातम्या

पोटाची वाढलेली ढेरी झपाट्याने होईल कमी! रात्री झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ, महिनाभरात दिसाल स्लिम
1

पोटाची वाढलेली ढेरी झपाट्याने होईल कमी! रात्री झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ, महिनाभरात दिसाल स्लिम

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या
2

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या

सकाळी पोट नीट साफ होतं नाही? मग स्वयंपाकघरातील या सोप्या उपायांची मदत घ्या, आतड्यांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर
3

सकाळी पोट नीट साफ होतं नाही? मग स्वयंपाकघरातील या सोप्या उपायांची मदत घ्या, आतड्यांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर

Contraceptive Pills: वंध्यत्व आणि स्तन कॅन्सरचा धोका वाढवतात गर्भनिरोधक गोळ्या, तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम
4

Contraceptive Pills: वंध्यत्व आणि स्तन कॅन्सरचा धोका वाढवतात गर्भनिरोधक गोळ्या, तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.