Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

अनेक पालक आपल्या मुलांसमोरच भांडतात अथवा अनेक गोष्टींचा ताण घरात आणतात. या सर्व गोष्टींचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होताना दिसून येतो. पालकांनी याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य पावलं उचला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 05, 2026 | 09:49 PM
पालकांच्या ताणाचा मुलांवर होणारा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

पालकांच्या ताणाचा मुलांवर होणारा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • घरात सतत ताणाचा मुलांच्या आरोग्यावर काय होतो परिणाम
  • तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती 
  • पालकांनी कोणती काळजी घेणे गरजेचे 
आधुनिक जीवनशैलीबरोबरच वाढलेल्या अपेक्षा, व्यस्त वेळापत्रक आणि काम- वैयक्तिक आयुष्यातील समतोल न साधाचा येणे यामुळे पालकत्वाचा ताण वाढत आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. या लेखाच्या माध्यमातून तज्ज्ञांनी पालकांमधील ताण कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहे.

पूर्वीच्या तुलनेत सध्या पालकत्व अधिक आव्हानात्मक ठरत आहे. कामाचा वाढता ताण, अभ्यासाच्या अपेक्षा, वाढता स्क्रीन टाइम आणि वाढत्या स्पर्धा यामुळे बरेच पालक सततच्या तणावाखाली वावरताना दिसून येतात. ते अनेकदा हा तणाव मुलांसमोर लपवण्याचा प्रयत्न करत असले तरी, मुलं घरी असलेला हा भावनिक ताण सहजपणे जाणवतात. कालांतराने, सतत पालकत्वाचा ताण मुलाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्य आणि एकूण विकासावरदेखील परिणाम करू शकतो. ही वास्तविकता  आहे ज्याबद्दल पालकांनी नेहमीच संवेदनशील असणे आणि त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. 

पालकत्वाचा ताण तुमच्या मुलाच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो?

हे सर्वज्ञात सत्य आहे की मुलं शांत आणि सुरक्षित वातावरणात वाढतात. जेव्हा पालक तणावाखाली वावरतात तेव्हा त्यामुळे घरात चिंता,दबाव आणि नैराश्याचे वातावरण निर्माण होते. अशा वातावरणात, मुलं असुरक्षित, दबावाखाली राहु लागतात. पालक रागावून, निराश होऊन, ओरडून किंवा मुलाला शारीरिक हिंसाचाराला बळी पाडून त्यांचा ताण व्यक्त करू शकतात. 

Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात घडवतील मोठा बदल; मुलांना शिकवण द्यायलाच हवी

नक्की काय घडते?

हा ताण वारंवार डोकेदुखी, पोटदुखी, झोप न लागणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे या स्वरूपात दिसून येतो, ज्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात. ते चिडचिडे, आक्रमक किंवा एकाकी होतात. अशी मूलं अनेकदा त्यांच्या पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्यास घाबरतात, जर त्यांनी त्यांच्याशी काहीही चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर पालकांना राग येईल, ते ओरडतील, रागवतील अशी भीती या मुलांमध्ये दिसून येते. 

काहींना शाळेत लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते किंवा अपयशाची भीती वाटू शकते. लहान मुलांमध्ये ताणतणाव हा अंथरुण ओले करणे किंवा अंगठा चोखणे अशा प्रकारातून दिसून येतो. व्यस्त जीवनशैलीमुळे कुटुंबातील दर्जेदार वेळेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबात भावनिक दुरावा निर्माण होतो. अनियमित दिनचर्या, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

खालील टिप्सचा अवलंब करा 

  • पालकांनी स्वतःच्या ताणतणावाला तोंड देण्यासाठी त्यावर अचूक मार्ग शोधणे गरजेचे आहे
  • दिर्घ श्वास घेणे, योगासने करणे आणि ध्यान करणे, थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घेणे किंवा बागकाम करणे, स्वतःची काळजी घेणे किंवा वाचन करणे यासारख्या विश्रांतीच्या तंत्रांचा शोध घ्यावा
  • मुलांनी दैनंदिन वेळापत्रक जसे की गृहपाठ, खेळणे आणि झोपेच्या आणि जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजेत. योग्य दिनचर्येमुळे मुलांना चिंता किंवा ताणतणावाऐवजी सुरक्षित वाटते
  • खुल्या आणि प्रामाणिक संवादाला प्रोत्साहन द्या, ज्यामुळे मुलांना निर्णयाची भीती न बाळगता त्यांच्या भावना व्यक्त करता येतील 
  • पालकांनी मुलांमध्ये स्क्रीन टाइम मर्यादित करावा आणि त्यांना बाहेर खेळण्यास, पुरेशी झोप घेण्यास आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रोत्साहित करावे
  • पालक आणि मुलांमधील भावनिक संबंध हा त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अतशय गरजेचा आहे; मुलांना अत्यंत आवश्यक असे लक्ष, प्रेम आणि आश्वासन दिल्यास त्यांना सुरक्षित वाटते आणि मानसिक आरोग्य चांगले राहते
  • पालकांनी आपल्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवणे, त्यांच्या चिंता समजून घेणे आणि बालपणातील चढ-उतारांना सहजतेने पार करण्यास मदत करणे सुनिश्चित करावे ज्यासाठी ते तयार नसतात
  • तुमच्या मुलांना त्यांच्या क्षमता ओळखण्यास आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करण्यासाठी घरात योग्य वातावरण तयार करणे गरजेचे आहे
Parenting Tips: 3 गोष्टीसाठी मुलांना कधीच ओरडू नये, लर्निंग स्किलवर होतो परिणाम; पालकांनी व्हा सावध

Web Title: Constant stress at home adverse effects on children s health parents should pay attention parenting tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:49 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news in marathi
  • parenting tips

संबंधित बातम्या

गोळी ठरतेय का गेमचेंजर? कॅन्सरच्या धोक्याला कमी करु शकते ॲस्पिरिन? संशोधनात झालाय खुलासा, जाणून घ्या
1

गोळी ठरतेय का गेमचेंजर? कॅन्सरच्या धोक्याला कमी करु शकते ॲस्पिरिन? संशोधनात झालाय खुलासा, जाणून घ्या

Women Health: प्रसूतीनंतर ७०% महिलांना पाठदुखीचा त्रास; उपचारास विलंब केल्यास दिर्घकालीन आजाराचा धोका
2

Women Health: प्रसूतीनंतर ७०% महिलांना पाठदुखीचा त्रास; उपचारास विलंब केल्यास दिर्घकालीन आजाराचा धोका

Pregnancy मध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास होते नॉर्मल डिलिव्हरी? काय आहे तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा
3

Pregnancy मध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास होते नॉर्मल डिलिव्हरी? काय आहे तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा

AMH चाचणी नक्की काय आहे? तुम्हाला करता येईल Pregnancy चे अचूक नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला
4

AMH चाचणी नक्की काय आहे? तुम्हाला करता येईल Pregnancy चे अचूक नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.