मधुमेह झाल्यानंतर आहारात या लाल फळांचे सेवन करावे
पूर्वीच्या काळी मधुमेहासारखा गंभीर आजार वयाच्या 60 मध्ये उद्भवत होता. मात्र हल्ली 20 व्या वर्षीसुद्धा अनेकांना मधुमेह होत आहे. मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी न पाळता आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. मधुमेह झाल्यानंतर साखर आणि इतर गोड पदार्थ खाऊ नये, असा सल्ला डॉक्टर रुग्णांना देतात. मात्र तरीसुद्धा मधुमेह झाल्यानंतर पथ्य पाळले जात नाही. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर पोषण आहार, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य, व्यायाम आणि औषधाचे सेवन इत्यादी गोष्टी पाळणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, पायांवर जखम होणे, चक्कर येणे, सतत अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. शिवाय जेवणात पथ्य पाळून मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात कोणत्या लाल रंगाच्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. ही लाल फळे खाल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.
लोहयुक्त डाळिंब आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. डाळिंबामध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि आरोग्याला फायदे होतात. रोजच्या आहारात नियमित डाळिंबाचे सेवन केल्यास रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. डाळिंबाचे दाणे खाण्यास आवडत नसतील तर तुम्ही डाळिंबाचा रस सुद्धा पिऊ शकता. डाळिंब अनेक आजारांवर प्रभावी आहे. त्यामुळे नियमित एक डाळिंब खावे.
डॉक्टरांकडे गेल्यानंतर सगळ्यात आधी डॉक्टर नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. मधुमेह झालेल्या रुग्णांनी नियमित एक सफरचंद खावे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. सफरचंद पासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता. यामध्ये आढळून येणारे पोषक घटक मधुमेह नियंत्रणात ठेवतात.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बेरीज खूप आवडतात. बेरिजमध्ये तुम्ही स्ट्रोबरी, ब्लूबेरी किंवा रास बेरी खाऊ शकता. चवीला आंबट गोड असलेल्या बेरीज आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात या फळांचे सेवन करावे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणत्याही फळांचे सेवन करून नये. असे केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते.