हिवाळ्यात पायांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय
हिवाळ्यात वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. वाढत्या थंडीचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. त्वचा फाटणे, त्वचा कोरडी होणे, पायांचा भेगा पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचा रुक्ष आणि कोरडी दिसते. वातावरणात बदल झाल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. पायांना भेगा पडल्यानंतर पायांमधून रक्त येऊ लागते. लवकर पाय बरे होत नाहीत. त्यामुळे या दिवसांमध्ये त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला पायांना पडलेल्या भेगांमधून रक्त येत असल्यास घरगुती उपाय करून पायांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो. ज्यामुळे त्वचे कोरडी आणि रुक्ष होते. त्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी चेहऱ्याला आणि पायांना मॉइश्चरायझर लावावे. मॉइश्चरायझर लावल्यामुळे पाय कोरडे पडत नाहीत. मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचेला हवे असलेले योग्य ते पोषण मिळते आणि आरोग्य सुधारते. यासाठी तुम्ही रात्री झोपण्याआधी खोबरेल तेलात बदाम तेल मिक्स करून लावू शकता. यामुळे पायांच्या भेगा भरल्या जातील.
हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकल युक्त क्रीम्स लावण्याऐवजी घरगुती उपाय करावे. यामुळे त्वचा सुंदर आणि निरोगी राहील. फेसपॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये ताजी मलाई घेऊन त्यात हळद मिक्स करावी किंवा अशीच मलाई त्वचेवर लावावी. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या गोरी आणि चमकदार दिसेल. मलाई त्वचेवर लावल्यामुळे चेहरा सुंदर दिसतो.
त्वचा आणि केसांसाठी दही अतिशय फायदेशीर आहे. दही खाल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. दही फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये दही, हळद, कोरफड जेल आणि विटामिन इ कँप्सूल मिक्स करा. तयार पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि पायांना पडलेल्या भेगांवर लावून काहीवेळ तशीच ठेवून द्या. यामुळे त्वचा मऊ होईल आणि सुंदर दिसेल. त्वचा कोरडी झाल्यानंतर तुम्ही हा फेसपॅक लावू शकता.
स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पायांच्या टाचा रुक्ष आणि कोरड्या पडतात. टाचा कोरड्या पडल्यानंतर हळूहळू पायांमधून रक्त येऊ लागते. पायांना झालेली जखम बरी करण्यासाठी पाण्यात शॅम्पू टाकून पाय काहीवेळ बुडवून ठेवा. यामुळे पायांवरील सर्व घाण आणि धूळ निघून जाईल. हलक्या हाताने पायांवर मसाज केल्यानंतर पायांवर जमा झालेली डेड स्किन निघून जाईल. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास पाय स्वच्छ होतील.