आहारात करा विटामिन बी १२ युक्त पदार्थांचे सेवन
जीवनशैलीमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे, पोषण आहार घेणे फार गरजेचे आहे. आहारामध्ये पोषकघटक, जीवनसत्वे आणि खनिजांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासंबंधित कोणतेही आजार उद्भवत नाहीत. पण आहारात बदल झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीरामध्ये असलेलं विटामिन बी 12 मांसपेशी आणि हाडांच्या मजबूतीसाठी प्रभावी ठरतात. त्यामुळे नियमित बी 12 युक्त पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य-istock)
शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागल्यानंतर अशक्तपणा येणे, सतत चक्कर येणे, हातपाय दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यानंतर अनेक वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची व्यवथित काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागल्यानंतर आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतील.
हे देखील वाचा: सकाळची ‘ही’ 6 लक्षणं दर्शवतात High Blood Pressure, वेळीच राहा सावध
शरीरामध्ये विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागल्यानंतर आहारात बीटरूटचे सेवन करावे. यामुळे शरीरातील लोहाची आणि विटामिन बी 12 ची कमतरता भरून निघेल. बीटमध्ये लोह, पोटॅशिअम, फोलेट आणि विटामिन डी आढळून येते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीनचे आणि लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
गाईच्या दुधाचे सेवन केल्याने शरीरातील विटामिन बी 12 चे प्रमाण वाढते.शरीरातील मांसपेशी आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी गीताचे दूध मदत करते. तसेच शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी गाईचे दूध प्रभावी आहे. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढत नाही.
हे देखील वाचा: ‘या’ ड्रायफ्रूटच्या सेवनामुळे होतात अनेक फायदे, डायबिटीज करतो कमी, देतो तंदुरुस्त हाडांची हमी
विटामिन सी युक्त संत्र्याचा ज्युस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि प्रभावी आहे. संत्र्याच्या सरबतमध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटामिन सी आणि विटामिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात संत्र्याचा ज्युस नियमित प्यावा.
सोया मिल्कमध्ये विटामिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळून येते. सोया मिल्क बाजारात सहज उपलब्ध होते. सोया मिल्क्मध्ये प्रथिने, फोर्टिफाईड इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात या दुधाचा समावेश करावा.