फोटो सौजन्य: Freepik
काजूत अनेक पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात. काजूमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे हृदयाचे आरोग्य नीट ठेवते. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. एका काजूमध्ये साधारण 5 ग्राम प्रोटीन असते. तसेच यामध्ये व्हिटॅमिन ई, के आणि बी6 पोषकतत्वे असतात जे शरीराला तंदुरुस्त ठेवतात.
व्हिटॅमिन ई पेशींचे नुकसान टाळते आणि व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करते. जर तुम्हाला दुखापत झाली असेल आणि त्यातून रक्त निघत असेल तर व्हिटॅमिन केमुळे रक्त जमा होते. तर व्हिटॅमिन B6 मुळे मेंदूचे काम जलद होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय, काजूत मॅग्नेशियम, जिंक, लोह आणि सेलेनियम सारखे अनेक पोषक घटक असतात, जे एकूण आरोग्यासाठी आवश्यक असतात. चला जाणून घेऊया काजू खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात.
काजूचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम ड्रायफ्रूट आहे. काजूमध्ये आढळणारे मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी ओळखले जातात. यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास मदत होते.
काजूत फॅटचे प्रमाण जास्त असूनही ते वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. काजूमध्ये असलेले हेल्दी फॅट, प्रोटिन्स आणि फायबर दीर्घकाळ आपले पोट भरलेले ठेवतात. त्यामुळे त्याचे सेवन केल्यावर जास्त खाण्याची इच्छा होत नाही. अभ्यासातून असे दिसून आले आहे की आपल्या आहारात काजूचा समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
काजू हे मॅग्नेशियमचे एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हाडे मजबूत ठेवण्यासाठी मॅग्नेशियम कॅल्शियमसोबत काम करते. याव्यतिरिक्त, काजूमध्ये असणारा व्हिटॅमिन के हाडांमधील फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
वास्तविक, काजू चवीला किंचितसा गोड लागतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की काजू रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. काजूमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, याचा अर्थ ते रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाहीत. मधुमेहाचे रुग्ण काजू नाश्त्यात खाऊ शकतात.
काजूमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे अँटिऑक्सिडंट्स हानिकारक प्रकाश आणि मोतीबिंदूपासून डोळ्यांचे रक्षण करतात. त्यामुळे रोज काजू खाल्ल्यास तुमची दृष्टी दीर्घायुषी होऊ शकते.