पोटावर वाढलेला चरबीचा घेर होईल आठवडाभरात कमी! उपाशी नियमित चावून खा 'ही' हिरवी पाने
जगभरात सगळीकडे वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. शरीरात लठ्ठपणा वाढू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते जे नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. वजन वाढल्यानंतर शरीराच्या इतर अवयवांवर अनावश्यक चरबी वाढू लागते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरावर अनावश्यक चरबी वाढल्यानंतर कोणतेही कपडे घालताना किंवा कपडे विकत घेताना खूप जास्त विचार करावा लागतो. याशिवाय बऱ्याचवेळा महिलांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होऊन जातो. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी बाजारातील महागडे डाएट, व्यायाम किंवा इतर सप्लिमेंट्स घेतले जातात. मात्र कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन केल्यास वजन कमी न होता दोन्ही किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन अजिबात करू नये.(फोटो सौजन्य – istock)
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक महिला सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. तर काही लोक संध्याकाळच्या जेवणात सॅलड खातात. पण चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या हिरव्या पानांचे नियमित सेवन केल्यास वाढलेली चरबी कमी होईल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. वजन कमी करण्यासाठी कढीपत्याच्या पानांचे उपाशी पोटी सेवन करावे.
जेवणात फोडणी देण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. कढीपत्त्याची पाने आरोग्यासोबतच केस आणि त्वचेसाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहेत. जेवणात कढीपत्त्याची फोडणी नसेल तर जेवणाला चांगली चव लागत नाही. वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्याची पाने चावून खावीत. त्यावर गरम पाणी प्यायल्यास पोटात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासोबतच पोट स्वच्छ करण्यासाठी कढीपत्त्याची पाने खाल्ली जातात. सकाळी उठल्यानंतर महिनाभर नियमित कढीपत्त्याची पाने चावून खाल्यास वाढलेले वजन कमी होईल.
कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अल्कलॉइड्स घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय कढीपत्ता खाल्यामुळे शरीरातील चयापचय सुधारून वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. या पानांच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कढीपत्याची पाने चावून खावीत. या पानांमध्ये मॅग्नेशियम, फायबर, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स आणि तांबे इत्यादी आवश्यक घटक असतात. नियमित पाने चावून खाल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय कोणते आहेत?
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पावडर स्वरूपात किंवा चहा म्हणून सेवन केले जाऊ शकते. दालचिनी आणि मध मिसळलेला चहा पिणे वजन कमी करण्यास मदत करण्याचा एक आरामदायी मार्ग असू शकतो. दिवसभर भरपूर पाणी पिणे हे एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि वजन कमी करण्यास मदत करू शकते.
वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीतील कोणते बदल मदत करू शकतात?
आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम करा, जसे की जलद चालणे, जॉगिंग किंवा पोहणे. फळे, भाज्या आणि पातळ प्रथिनेयुक्त संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. प्रक्रिया केलेले अन्न, साखरेचे पेये आणि अस्वास्थ्यकर चरबी यांचे सेवन कमी करा.
वजन कमी करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
जर तुम्हाला काही अंतर्निहित आरोग्य समस्या किंवा चिंता असतील, तर वैयक्तिकृत सल्ल्यासाठी डॉक्टर किंवा नोंदणीकृत आहारतज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले. वजन कमी करण्यासाठी आणि तुमच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी बदल करण्यासाठी वेळ लागतो.