केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदिक उपाय! ताकात मिक्स करून प्या 'ही' गुणकारी पावडर
हल्ली केस गळतीची समस्या अतिशय सामान्य झाली आहे. महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू केस गळून टक्कल पडण्याची भीती असते. याशिवाय केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम किंवा हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र यामुळे केसांचे आणखीनच नुकसान होते. वातावरणात होणारा बदल, धूळ, माती, प्रदूषण किंवा घामामुळे त्वचेसह केस चिकट होऊन जातात. केस चिकट झाल्यानंतर केसांमध्ये कोंडा किंवा इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. इन्फेक्शन वाढल्यानंतर टाळूवरील त्वचा अतिशय खराब होऊन लाल होते.(फोटो सौजन्य – istock)
अपुरी झोप आणि मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मानसिक तणाव वाढल्यानंतर हळूहळू आरोग्यासोबतच केसांवर सुद्धा त्याचे परिणाम दिसून येतात. अधिककाळ दुर्लक्ष केल्यामुळे केसांची मूळ अतिशय कमकुवत होऊन जातात आणि केस अतिशय कमकुवत होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक चूर्ण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तयार केलेले आयुर्वेदिक चूर्ण ताकासोबतच प्यायल्यास केसांच्या समस्या दूर होतात. केसांच्या समस्यांवर कायमचा आराम मिळ्वण्यासाठी आहारात बदल करणे, भरपूर पाणी पिणे, शरीर हायड्रेट ठेवणे आणि योग्य हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे केस मजबूत होतात.
केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हेल्दी ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घरगुती उपाय केल्यामुळे शरीरासह केसांना अनेक फायदे होतात. आयुर्वेदिक चूर्णाचे सेवन केल्यामुळे शरीर हेल्दी राहण्यासोबतच केसांची मूळ मजबूत होतात आणि केस गळणे, केस तुटणे किंवा केस तुटण्याची समस्या कमी होते.
केस गळतीची समस्या होईल कायमची दूर! साजूक तूप आणि अश्वगंधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील घनदाट
आयुर्वेदिक चूर्ण बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढीपत्ता, मेथी दाणे, तीळ, जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या कढईमध्ये मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून आवळा आणि इतर साहित्य बारीक पावडर तयार करा. तयार केलेले चूर्ण काचेच्या डब्यात भरून ठेवा. एक ग्लास ताकात अर्धा चमचा चूर्ण टाकून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळेल. ही पावडर तुम्ही कोमट पाण्यात टाकून सुद्धा पिऊ शकता.