Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2024: 77 की 78 भारत नक्की कोणते वर्ष साजरा करत आहे? यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम, जाणून घ्या

भारताचा राष्ट्रीय सण अखेर जवळ आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारत आपला स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी साजरा करणारा आहे. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला शाच्या स्वातंत्र्याचा उत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो, म्हणजेच या वर्षी भारतात कोणता स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे आणि 2024 च्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? याविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 14, 2024 | 12:24 PM
Independence Day 2024: 77 की 78 भारत नक्की कोणते वर्ष साजरा करत आहे? यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम, जाणून घ्या

Independence Day 2024: 77 की 78 भारत नक्की कोणते वर्ष साजरा करत आहे? यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

देशाच्या सन्मानाचा आणि आनंदाचा दिवस अखेर जवळ आला आहे. देशभरात उद्या 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. हा दिवस देशाचा राष्ट्रीय सण म्हणून ओळखला जातो. याच दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि खऱ्या रीतीने सर्व बंधनांतून स्वातंत्र्य झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने ब्रिटिशांच्या तावडीतून आपली सुटका केली आणि म्हणूनच हा दिवस आपण दरवर्षी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो.

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाही जय्यत तयारीला आता सुरुवात झाली आहे. देशभर या दिवशी झेंडा फडकावला जातो तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन नक्की 77 वा की 78 वा आहे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. चला तर मग याविषयी आणि 2024 च्या स्वातंत्र्य दिनाच्या थीमविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

स्वातंत्र्यदिन 2024 ची वर्षगाठ

स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचा आणि नेत्यांचा संघर्ष फळाला आणि 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. मागील वर्षामध्ये, भारताने स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला होता. यावेळी लोक संभ्रमात आहेत की, भारत यावर्षी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे की 78 वा. जर आपण स्वातंत्र्याच्या तारखेपासून म्हणजे 15 ऑगस्ट 1947 मोजले तर देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. यासह, भारत 2024 मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.

हेदेखील वाचा – Independence Day 2024: भारतातील ‘या’ राज्यात कधीही साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट! कारण काय? जाणून घ्या

स्वातंत्र्यदिन 2024 ची थीम

यावर्षी स्वातंत्र्यदिन 2024 ची अधिकृत थीम ‘विकसित भारत’ आहे. ही थीम 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात बदलण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे प्रतीक आहे. ही थीम पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.

 

Web Title: Independence day 2024 which year is india celebrating of independence day is it 77 or 78

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 12:14 PM

Topics:  

  • Independence Day 2024
  • india

संबंधित बातम्या

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!
1

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!

स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्…. भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू
2

स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्…. भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर
3

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?
4

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.