आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त द्या शुभेच्छा (फोटो सौजन्य - Canva)
दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आणि आज तो खास दिवस आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपले शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे. योग केल्याने आपले शरीर मजबूत आणि लवचिक बनते, तसेच मनाला शांती मिळते.
ही भारताची एक प्राचीन परंपरा आहे, जी आज जगभरात स्वीकारली जात आहे. या खास प्रसंगी, आपण काही प्रेरणादायी कोट्सद्वारे योगाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि दररोज योग करण्यास स्वतःला प्रेरित करू शकतो. चला काही प्रेरक योग कोट्स वाचूया, जे शरीर, मन आणि आत्मा यांना जोडण्यास मदत करतील आणि तुम्हालाही दरवर्षी आणि नियमित योग कऱण्यासाठी या संदेशातून प्रेरणा मिळेल (फोटो सौजन्य – Canva/iStock)
योग प्रेरणात्मक संदेश
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही तर आत्मा, मन आणि शरीर यांना संतुलित करण्याची ती एक सखोल प्रक्रिया आहे
योगा केल्याने मन आणि शरीर हे दोन्ही व्यवस्थित संतुलित राहते. गेल्या अनेक वर्षांपासून योगाभ्यास हा सिद्ध झालाय आणि त्याचा तुम्ही नियमित वापर करून घ्यायला हवा. जगभरात योगाचे महत्त्व यामुळेच वाढल्याचे दिसून येत आहे.
International Yoga Day: 8 तास बैठे काम, वाढतोय लठ्ठपणा; मात करण्यासाठी वापरा 7 Desk Yoga चे प्रकार
योग शरीराला ताजेतवाने करतो आणि मनाला ऊर्जा देतो. जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा मन देखील सर्जनशील बनते
मनाला अधिक सखोल ऊर्जा देण्यासाठी आणि शरीर कायम ताजेतवाने राखण्यासाठी योगाचा अधिक चांगला तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. योगामुळे तुमचे मन आणि शरीर हे एका पातळीवर समान होतात आणि मनावर ताबा मिळवता येतो.
जर तुम्ही जीवनाच्या धावपळीत शांती शोधत असाल तर योगाचा अवलंब करा, तो तुम्हाला आतून मजबूत बनवतो
सध्या सतत आपली धावपळ चालू असते आणि यामुळे मन अधिक काळ अशांत असल्याचे जाणवते. अशावेळी योगाभ्यास तुम्हाला अधिक शांत करण्यास मदत करतो. नियमित योगाभ्यासाचे धडे घेतल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यातील बदल लवकरच कळेल.
योग दिन आपल्याला आठवण करून देतो की स्वतःसाठी वेळ काढणे महत्वाचे आहे, जेणेकरून आपण स्वतःशी पुन्हा जोडले जाऊ शकू
धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. सध्या लहान वयातही माणसाचे मरण आलेले दिसते. अशावेळी शरीराचा थकवा घालविण्यासाठी तुम्ही योगासाठी वेळ काढायलाच हवा.
योग हा ताण, चिंता आणि थकवा यावर उपाय आहे. तो केवळ आजारांशी लढत नाही तर मानसिक दुर्बलतेशीदेखील लढतो
सध्या कामापासून ते नात्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा ताण दिसून येतो आणि यातून बाहेर पडण्यासाठी योगा आपल्याला मदत करते. योगा केवळ शारीरिक आजारांपासूनच आपल्याला दूर ठेवत नाही तर मानसिक आजारांशी लढून आपल्याला त्यावर नियंत्रण मिळवून देण्यासाठीही मदत करते.
योग केवळ शरीराला वाकवत नाही तर विचारांना लवचिक आणि स्थिरदेखील बनवतो. योग हेच जीवन आहे
विचारांवर नियंत्रण नसेल तर मनाचा स्थिरपणा कधीच राहात नाही आणि यासाठी तुम्ही योगा नियमित केल्यास मनावर योग्य नियंत्रण मिळते आणि तुमच्या मनावरचा ताबा सुटत नाही. तुम्ही योग्य दिशेने विचार करणे चालू करता आणि अधिक चांगले आय़ुष्य तुम्हाला यातून मिळते
दिवसभर ऊर्जा आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी दररोज सकाळी काही मिनिटे योगा करा
दिवसभर आपण सतत व्यापात आणि कामात असतो आणि यामुळे चिडचिड होणे, शरीरातील उर्जा कमी होणे साहजिक आहे. पण सकाळी लवकर उठून योगा केल्याने यामध्ये नक्कीच बदल घडतो. २१ जूनपासून तुम्हीही योगा करण्याचा प्रण करा आणि स्वतःमधील बदल पहा
International Yoga Day: आदियोगी भगवान शिव यांना मानले जाते पहिले गुरु, जाणून घ्या योगाचा इतिहास
जेव्हा श्वासोच्छवासावर नियंत्रण असते तेव्हा जीवन देखील नियंत्रणात येते. ही योगाची कला आहे
अनेकदा चुकीचे निर्णय, रागावर अनियंत्रण यामुळे आपले स्वतःच्या श्वासावरही नियंत्रण राहत नाही. पण योगकलेमध्ये यावर नियंत्रण मिळवणे सहजसाध्य आहे. यासाठी तुम्ही नियमित योगाभ्यासाच वापर करा
योग मन, शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन स्थापित करतो, ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या आंतरिक शक्तीची ओळख पटते
शरीर, मन आणि आत्मा यांचे योग्य संतुलन व्हायचे असेल तर तुम्ही योगाची मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण स्वतः नक्की काय आहोत याची ओळख पटवून देण्यासाठीही योगा तुम्हाला कामी येते
योग दिनी फक्त सराव करू नका, तर तो तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा
२१ जून रोजी केवळ एक दिवस योगा करू नका तर तुमच्या नियमित आयुष्याचा योगा भाग बनवा आणि याचा नियमित वापर करून घ्या, जेणेकरून आयुष्याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टीकोनही बदलेल