फोटो सौजन्य- pinterest
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिन हा शब्द संस्कृतमधील युज शब्दांपासून आलेला आहे. मान्यतेनुसार योगाचा इतिहास हजारो वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याची उत्पत्ती भारतात झाली असल्याचे म्हटले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, योगाचा संबंध भगवान शिवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. आदियोगी भगवान शिव यांना पहिले गुरु का मानतात आणि योगाचा काय आहे इतिहास, जाणून घ्या
आपण पाहिला गेले तर योगाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने योगाची व्याख्या केलेली दिसते. पतंजलीने ‘मनाच्या प्रवृत्तींवर नियंत्रण’ हा योग मानला आहे, तर व्यासांनी समाधीला योग मानले आहे. या योगाची उत्पत्ती भगवान शिवापासून झाली असे मानले जाते. असे म्हटले जाते की, योगाद्वारे व्यक्ती विश्वसागर पार करू शकते म्हणजेच योगाद्वारे आपण ध्यान, समाधी आणि मोक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी ठरु शकतो.
योगा म्हणजे फक्त व्यायाम नाही तर शरीर आणि मनाला संतुलित ठेवण्याची कला समजली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, हजारो वर्षांपूर्वी भगवान शिव हिमालयातील कांतीसरोवर तलावाच्या काठावर सप्तर्षींना योगाचे ज्ञान देत होते. असे म्हटले जाते की, योगाची सुरुवात संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळापासून झाली. या सर्व योगा संबंधित माहिती सिंधू-सरस्वती संस्कृतीत आढळून येते. तेथील उत्खननावेळी अनेक पुतळे आणि शिक्के सापडले जे योगा करताना असल्याचे म्हटले जाते. या सर्व घटनांवरुन त्यावेळी योगा असल्याचे मानले जाते.
योग या शब्दाचा सर्वांत प्रथम उल्लेख ऋग्वेदात केला गेला आहे. त्यानंतर उपनिषदांमध्येही योगाचा उल्लेख आढळतो. शास्त्रामध्ये योगाची सुरुवात भगवान शिवापासून झाली असे म्हटले जाते म्हणून शिवाला आदि योगी किंवा आदि गुरु असे देखील म्हटले जाते. योगाची सुरुवात भगवान भगवान शिवानंतर ऋषी आणि संतांपासून झाली अशी मान्यता आहे. त्यानंतर भगवान कृष्ण, महावीर गौतम बौद्ध यांनी आपापल्या पद्धतीने योगाचा विस्तार केला. एवढेच नव्हे तर सिंधू संस्कृतीमधून सापडलेल्या विविध ज्यामध्ये योगाची शारीरिक आसने दर्शवल्याचा पुरावा सापडतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)