फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना कोणती भावनिक भेट द्यायची असेल तर तुम्ही त्यांचे नाव ताऱ्यांना देऊ शकता आणि हे शक्य आहे. बऱ्याचदा आपण एखाद्याला काय भेट द्यावे, या प्रश्नात इतके गोंधळून जातो की त्याचे उत्तर मिळेपर्यंत फार उशीर होतो आणि अनेकदा उत्तरही सापडत नाही. पण टेंन्शन नॉट! कोणती स्थायी वस्तू गिफ्ट देण्यापेक्षा एखादी भावनिक वस्तू गिफ्ट द्या. ती भावनिक वस्तू म्हणजे आकाशात दिसणाऱ्या ताऱ्याला नाव देणे!
पण हे करण्यापूर्वी लक्षात असू द्या की “तारा आपल्या नावावर घेणे” हे विज्ञाननिष्ठ किंवा कायदेशीररीत्या शक्य नाही. आकाशातील तारे कोणत्याही व्यक्तीच्या मालकीचे नसतात, ते संपूर्ण विश्वाचे आहेत. इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियन (IAU) ही एकमेव अधिकृत संस्था आहे जी तार्यांना, ग्रहांना किंवा आकाशातील वस्तूंना नावे देते, आणि ते फक्त वैज्ञानिक पद्धतीनुसार केलं जातं.
पण काही खासगी कंपन्या “Name a Star” किंवा “Buy a Star” अशा सेवेद्वारे तारा तुमच्या किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नावावर “नोंदवून” देतात. त्या बदल्यात ते तुम्हाला एक सर्टिफिकेट देतात. मात्र ही नोंद अधिकृत नसते, म्हणजेच खगोलशास्त्रज्ञ किंवा जगातील विज्ञान संस्था तुमच्या नावाने तो तारा ओळखणार नाहीत. हे फक्त एक भावनिक गिफ्ट किंवा आठवण म्हणून वापरलं जातं. म्हणजेच, ताऱ्याला आपल्या नावावर “अधिकृतपणे” घेता येत नाही, पण भेटवस्तू/रोमँटिक गिफ्ट म्हणून नोंदणी करून घेता येते.
अशा प्रकारे ताऱ्यांना नाव देता येते