Painkillers during menstruation: मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रत्येक मुलीसाठी मासिक पाळीशी संबंधित समस्या वेगवेगळ्या असतात. काही स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी पाठदुखीचा त्रास होतो तर काही मुलींना मूड स्विंग जास्त होतो. अनेक मुलींना मासिक पाळीच्या वेळी खालच्या ओटीपोटात वेदना आणि सूज जाणवते, ज्याला मासिक पाळीच्या क्रॅम्प म्हणतात. मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काही मुली सर्रास वेदनाशामक औषधे (पेन किलर) घेतात. या वेदनाशामक औषधांचे प्रमाण जास्त असते जे मासिक पाळीच्या क्रॅम्प्सपासून लवकर आराम देतात. पण मासिक पाळी दरम्यान वेदनाशामक औषध घेणे खरोखर सुरक्षित आहे का? असाही प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. याबाबत नवी दिल्लीचे प्रसूती आणि स्त्रीरोग डॉ. मनन गुप्ता यांनी मासिकपाळी दरम्यान पेनकिलर घेण्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले आहे.
मासिक पाळी दरम्यान वेदनाशामक गोळ्या घेणे सुरक्षित आहे का? मासिक पाळीत वेदनाशामक घेणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न विचारल्यावर डॉ. मनन म्हणाले की, मासिक पाळी दरम्यान वेदनाशामक औषधे घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना, क्रॅम्प्स कमी करण्यासाठी ही औषधे घेतली जातात. ही औषधे शरीरातील गर्भाशयाला आकुंचन पावणाऱ्या काही रसायनांना रोखून वेदना कमी करतात. बहुतेक महिला मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांत ही औषधे घेतात. कारण सुरुवातीच्या काळात जास्त समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत ही औषधे घेतल्याने वेदना लवकर कमी होतात.
Monsoon Alert: देशभरात कोसळधारांनी घातले थैमान; मात्र ‘या’ राज्यात पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम
पण, मासिक पाळीच्या काळात वेदनाशामक औषधे फक्त तेव्हाच घ्यावीत जेव्हा त्यांची खूप गरज असते. जर तुम्हाला तीव्र क्रॅम्प्स येत असतील तरच तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा डोस ठरवू शकता. जर तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा तुम्ही दररोज कोणतेही औषध घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पेनकिलर घ्यावी. जास्त प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्याने कधीकधी आम्लपित्त आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये, यामुळे मूत्रपिंड किंवा यकृताशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. दमा, अल्सर किंवा हृदयरोग असल्यास, त्यांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या क्रॅम्पसाठी वेदनाशामक औषधे न घेण्याचा प्रयत्न करा. मासिक पाळीच्या क्रॅम्प्सपासून आराम मिळवण्यासाठी, तुम्ही खालच्या पोटावर हीट पॅड लावू शकता. याशिवाय, हलका व्यायाम करा, विश्रांती घ्या. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. जर वेदना तीव्र असेल किंवा तुमच्या दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय आणत असतील आणि शरिरातींत अंतर्गत आरोग्यांशी बंधित असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही विलंब न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
याशिवाय, मासिक पाळी दरम्यान वेदनाशामक औषधे घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे. मासिक पाळी दरम्यान होणारे पेटके कमी करण्यासाठी ही औषधे घेतली जातात. ही औषधे शरीरातील गर्भाशयाला आकुंचन पावणाऱ्या काही रसायनांना रोखून वेदना कमी करतात. पण हे खूप कमी प्रमाणात घेतले पाहिजे. पण, जर तुम्ही त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर यकृत किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
डॉक्टरांच्या मते, प्रत्येक महिलेसाठी मासिक पाळी वेगवेगळी असते. साधारणपणे ३ ते ७ दिवस मासिक पाळी येणे सामान्य आहे. पण जर एखाद्याला २ दिवस किंवा त्यापेक्षा कमी आणि ८ दिवसांपेक्षा जास्त मासिक पाळी येत असेल तर ती सामान्य म्हणता येणार नाही.
(टीप- लेखात तुम्हाला सामान्य माहिती देण्यात आली आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.)