दिल्लीत पाऊस लांबणीवर (फोटो- ani)
नवी दिल्ली: देशभरात सर्वत्र मान्सूनचे आगमन झाले आहे. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, केरळसह सर्वच राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र दिल्लीकरांना अजूनही मान्सूनची वाट पहावी लात आहे. पाऊस सुरू झाला नसल्याने उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अजूनही पावसाचे आगमन झाले नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदी दुथडी भरून वाहत आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये तूफान पाऊस सुरू आहे.
दिल्लीमधील नागरिकांना मान्सूनची वाट पहावी लागत आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने दिल्लीकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिल्लीत मागील आठवड्यात जोरदार पाऊस होणीचा अंदाज वर्तवला होता. मात्र अजूनही दिल्लीत पावसाचे आगमन झाले नसल्याचे दिसून येत आहे.
भारतीय हवामान विभागाने उत्तराखंड, गुजरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. केरळ, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर अन्य राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहा:कार
पूर्ण देश मान्सूनने व्यापला आहे. देशातील अनेक राज्यात तूफान पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे सगळीकडे पाणीच पानी पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पुरामुळे 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
हिमाचल प्रदेशबरोबरच जम्मू काश्मीरच्या राजौरी, डोडा, कठूआ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने आणि ढगफुटी झाल्याने 2 लहान मुले आणि 3 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने 25 जूनपासून 1 जुलैपर्यंत हिमचल प्रदेश आणि अन्य राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Warning for 28th June 2025#WeatherUpdate #IndiaWeather #weatherforecast #Lightning #Rainfall #thunderstorm #monsoon2025 #IndiaWeather #WeatherUpdate #Forecast #Meteorology #Gujarat #Odisha #Jammu #HimachalPradesh #Uttarakhand #Rajasthan #UttarPradesh #MadhyaPradesh… pic.twitter.com/jKOmLixOfP
— India Meteorological Department (@Indiametdept) June 27, 2025
29 जुनसाठी हवामान विभागाने हिमाचल प्रदेशसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बिलासपुर, सिमला, चंबा, कुल्लू आणि मंडी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 आणि 27 जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. 29 आणि 30 जूनला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरातमध्ये जोरदार पावसाचा इशारा
गुजरात राज्यात देखील प्रचंड पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमधील 26 जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. तर तीन जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पानी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.