Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलगा खोटं बोलतोय? शिक्षा न करता ‘या’ उपायांनी सुधारा त्याची सवय

मुलं खोटं बोलायला लागली तर रागावण्यापेक्षा समजून घेणं महत्त्वाचं आहे. संयम, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाने त्यांना प्रामाणिकपणाची सवय लावता येते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 29, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलं खोटं बोलतात हे बहुतेक वेळा सामान्य वाटतं. पण ही सवय वारंवार होऊ लागली, तर ती पालकांसाठी मोठी चिंता बनते. मुलं खोटं बोलतात त्यामागं अनेक कारणं असू शकतात, जसं की शिक्षा होईल या भीतीमुळे, पालकांच्या अपेक्षा जास्त असल्याने, लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा केवळ त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे. अशा वेळी मुलाला रागावण्याऐवजी किंवा शिक्षा करण्याऐवजी प्रेम, संयम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

गणपती बघायला जाताना गर्दीत लहान मुलांची, वयस्कर लोकांची ‘अशा’ पद्धतीने घ्या काळजी,सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स

सकारात्मक वातावरण द्या

मुलाला घरात असा माहोल मिळायला हवा, जिथे तो निर्धास्तपणे सत्य बोलू शकेल. चूक झाल्यास त्याला धीराने समजावून सांगा. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो खोटं न बोलता सत्य बोलण्याची हिम्मत करेल.

स्वतः आदर्श बना

मुलं आईवडिलांचं अनुकरण करतात. पालकांनी नेहमी सत्य बोलण्यावर भर दिला आणि खोटं टाळलं, तर मुलांमध्येही आपोआप ही सवय रुजते.

शिक्षेऐवजी समज द्या

मुलं खोटं बोलली, तर त्यांना शिक्षा न करता प्रेमाने समजवा. पनिशमेंटच्या भीतीमुळे मुलं अजून खोटं बोलतात, पण समजावल्यामुळे ते सत्याची किंमत शिकतात.

मोकळेपणाने संवाद साधा

मुलांशी रोज गप्पा मारा, त्यांचे विचार ऐका. जेव्हा ते स्वतःहून मनातील गोष्टी सांगतात, तेव्हा खोटं बोलण्याची गरज उरत नाही.

खोटं का बोललं ते समजून घ्या

प्रत्येक खोट्याच्या मागे काहीतरी कारण असतं. ते कारण शोधून त्यावर उपाय करणं महत्त्वाचं आहे.

सत्य बोलल्यावर कौतुक करा

मुलांनी जेव्हा सत्य सांगितलं, तेव्हा त्यांचं कौतुक करा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रामाणिकपणाची सवय पक्की होते.

नैतिक कथा सांगा

मुलांना सत्य–खोटं यावर आधारित कथा ऐकवा. कथांमधून ते नैतिक मूल्यं सहज शिकतात.

अनुशासन शिकवा

मुलांना प्रत्येक कृतीची जबाबदारी घ्यायला शिकवा. अनुशासन व ईमानदारीचं महत्त्व पटवून द्या.

वन्यजीवप्रेमींसाठी खास! भारतातील ‘ही’ 10 ठिकाणे ठरतील जंगल सफारीसाठी बेस्ट चॉईस

संयम ठेवा

मुलांची सवय एका दिवसात बदलत नाही. सातत्याने संयम, प्रेम आणि मार्गदर्शन दिल्यास ते हळूहळू खोटं बोलणं सोडून सत्य बोलायला लागतात.

एकंदरीत, मुलं खोटं बोलतात म्हणून त्यांना शिक्षा देणं हा उपाय नाही. योग्य वातावरण, समजूतदारपणा, प्रेम आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच मुलं प्रामाणिकपणाची कास धरतात. अशा प्रकारे तुम्ही त्यांना हळूहळू सत्य बोलण्याची सुंदर सवय लावू शकता.

Web Title: Is your child lying improve his habit with these solutions without punishment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • parenting tips

संबंधित बातम्या

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर
1

वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर

Parenting Tips: मुलं का बिघडत आहेत? ‘आई – वडिलांच्या चुका…’, काय बोलून गेले प्रेमानंद महाराज, पालकांनी वाचाच!
2

Parenting Tips: मुलं का बिघडत आहेत? ‘आई – वडिलांच्या चुका…’, काय बोलून गेले प्रेमानंद महाराज, पालकांनी वाचाच!

Kangaroo Care मुळे बाळाच्या विकासात मदत, Skin To Skin कॉन्टॅक्ट किती गरजेचा
3

Kangaroo Care मुळे बाळाच्या विकासात मदत, Skin To Skin कॉन्टॅक्ट किती गरजेचा

महाराष्ट्राचे दादा-वहिनी रितेश-जेनिलियाचे Parenting का आहे खास; असे संस्कार जे सेलिब्रिटींनी शिकावेच
4

महाराष्ट्राचे दादा-वहिनी रितेश-जेनिलियाचे Parenting का आहे खास; असे संस्कार जे सेलिब्रिटींनी शिकावेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.