Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुषांना हवा रोमान्स तर महिलांना…Jeevansathi च्या ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट 2025’ मध्ये Single लोकांच्या नातेसंबंधावर भाष्य

जीवनसाथी या लग्न जुळवणाऱ्या प्लॅटफॉर्मने नुकताच एक रिपोर्ट जारी केला आहे. यात अविवाहित स्त्री आणि पुरुष यांच्या नातेसंबंधावर भाष्य केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2025 | 08:40 PM
पुरुषांना हवा रोमान्स तर महिलांना...Jeevansathi च्या 'मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट 2025' मध्ये Single लोकांच्या नातेसंबंधावर भाष्य

पुरुषांना हवा रोमान्स तर महिलांना...Jeevansathi च्या 'मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट 2025' मध्ये Single लोकांच्या नातेसंबंधावर भाष्य

Follow Us
Close
Follow Us:

जीवनसाथीचा 21000 पेक्षा जास्त प्रतिसादकांच्या विचारांवर आधारित ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट 2025’ भारतीय अविवाहितांमधील नात्यांसंबंधी बदलत्या प्राथमिकतांवर प्रकाश टाकतो. या निरीक्षणांमधून सूचित होते की, पुरुष प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देतात, तर महिला विशेष करून सुसंगततेला (कम्पॅटिबिलिटी) महत्त्व देतात. विवाह, आर्थिक स्थैर्य आणि जोडीदाराची निवड करण्यात माता-पित्यांचा प्रभाव याबाबतीती बदलत चाललेल्या वृत्तीवर देखील हा अहवाल प्रकाश टाकतो.

या सर्वेक्षणानुसार 29% महिलांच्या तुलनेत 47% पुरुष जोडीदाराची निवड करताना प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देतात. तर 39% महिला सुसंगततेला अग्रक्रम देतात. केवळ 11% अविवाहित असे आहेत, जे जोडीदाराची निवड करताना आर्थिक स्थैर्य हा सर्वात महत्वाचा घटक मानतात. यात प्रादेशिक भेद देखील दिसून आला आहे. दिल्ली आणि मुंबईतील अविवाहितांच्या लेखी रोमान्सला महत्त्व आहे, तर बंगळूरमधील अविवाहित सुसंगततेवर भर देतात.

लग्नाच्या पहिल्या रात्री करू नका ‘या’ गोष्टी! सगळी रात्र होईल खराब

या अहवालात असेही आढळून आले की, 40% अविवाहित योग्य जोडीदार मिळाल्यास परदेशी जायला तयार आहेत. हा पारंपरिक अपेक्षांमधील मोठा बदल आहे. परंतु, 70% पालक मात्र अशी अपेक्षा करत आहेत की, आपल्या मुलांनी लग्न करून भारतातच राहावे किंवा भारतात परतावे. शहरानुसार या विचारसरणीत बदल होत असल्याचे दिसते. मुंबई, पुणे आणि बंगळूरमधील प्रतिसादकांनी एनआरआय जोडीदाराशी विवाहबद्ध होण्याची तयारी अधिक दर्शविली आहे. तर, दिल्लीतील अविवाहित मात्र भारतातच स्थायिक होण्याबाबत आग्रही दिसतात.

जीवनसाथीचे चीफ बिझनेस ऑफिसर रोहन माथुर म्हणाले, “भारतीय अविवाहित नातेसंबंधाच्या नियमांना नव्याने आकार देत आहेत. सुसंगततेला आणि व्यक्तिगत आवडी-निवडीला पारंपरिक अपेक्षांपेक्षा जास्त प्राधान्य देत आहेत. जीवनसाथीच्या ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट 2025’ मध्ये ही बदलती विचारसरणी स्पष्ट दिसून येते. यामध्ये प्रेमाचे वाढते प्राधान्य दिसते. म्हणजेच सामाजिक दबावापेक्षा व्यक्तिगत मूल्यांशी निगडित प्रेमाला वाढती प्राथमिकता देण्यावर भर दिसून येतो. एक विश्वसनीय मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म म्हणून अर्थपूर्ण नाती जोडण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी अविवाहितांना सक्षम करण्याबाबत आम्ही वचनबद्ध आहोत.”

वय वर्ष 27च्या खालील अविवाहितांच्या मते, 27 ते 30 हे विवाहबद्ध होण्यासाठीचे आदर्श वय आहे. परंतु वयाने मोठे असलेले प्रतिसादक आणि अनेक माता-पिता यांच्या मते मात्र योग्य जोडीदार मिळाल्यावर विवाह केला पाहिजे. हा विवाह-योग्य वयाच्या बाबतीतील एक अधिक फ्लेक्सिबल दृष्टिकोन आहे.

‘Open Marriage’ काय आहे? एकापेक्षा जास्त जोडीदारांशी संबंध असणारे नाते…

लग्नावर होणाऱ्या खर्चात समान आर्थिक विभागणीची अपेक्षा या सर्वेक्षणातून व्यक्त झाली आहे. सुमारे 72% अविवाहित मानतात की, खर्च दोन्ही जोडीदारांमध्ये वाटला गेला पाहिजे. फक्त 17% अविवाहितांना असे वाटते की, ज्यांना थाटामाटात लग्न करायची इच्छा असेल, त्यांनी स्वतःच हा खर्च केला पाहिजे. विचारातील हा बदल पालकांना देखील मान्य आहे. एका बाजूच्याच पक्षावर आर्थिक बोजा येण्याच्या पारंपरिक पद्धतीपासून दूर जाण्याचा संकेत यातून मिळतात.

माता-पिता आता मुख्यतः विश्वसनीय सल्लागार बनले आहेत आणि निर्णय घेण्याचा अधिकार मोठ्या प्रमाणात स्वतः उपवर मुला-मुलीकडे आहे. फक्त 4% प्रतिसादकांनी सांगितले की, त्यांचे आई-वडील त्यांच्या पसंतीचा जीवनसाथी निवडतील. यावरून विवाह विषयक निर्णय घेण्यातील स्वायत्ततेचे वाढते प्रमाण दिसून येते. जोडी जुळवताना ज्योतिष शास्त्रासंबंधी दृष्टिकोन सतत बदलत आहे. दिल्लीतील प्रत्येक तीन पैकी एक प्रतिसादक असे मानतो की कुंडली जुळवणे महत्त्वाचे आहे. मात्र मुंबईतील अविवाहित कुंडली जुळवण्यापेक्षा व्यक्तिगत सुसंगततेला प्राधान्य देताना दिसतात.

आधुनिक नात्यांत संतुलन आणि व्यक्तिगत ध्येये आणि मूल्ये यांची कास न सोडता प्रेम शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या प्राथमिकता बदलत आहेत. अशा वेळी ‘जीवनसाथी’ उपवर मुला-मुलींना त्यांच्या अनोख्या प्रवासाशी जुळवून घेणारी अर्थपूर्ण नाती शोधण्यासाठी त्यांना मदत करत आहे.

Web Title: Jeevansathis modern matchmaking report 2025 on what signle men and women want in love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 08:40 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • Love Relationship tips
  • relationship

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.