फोटो सौजन्य - Social Media
ओपन मॅरेज हा पाश्चिमात्य देशांमध्ये चालणारा एक ट्रेंड आहे. लग्न म्हणजे दोन जीवांना एकत्र जोडणारे नाते! जेव्हा एखादा व्यक्ती विवाह बंधनात अडकतो तेव्हा त्याचे कुणा एकाशी या जन्माची गाठ जोडली जाते. पण जेव्हा ही गाठ आणखीन कुणाशी तरी जोडली जाते किंवा दोन जीवांमध्ये तिसऱ्या आणि आणखीन कितीतरी जीवांची एंट्री होते तेव्हा त्यास Open Marriage असे म्हणतात. पण यात तिसऱ्या जीवाची होणारी Entry ही चुकीची नसते, कारण हा सगळा खेळ सगळ्यांच्या संमतीने होत असतो. आता एखाद्या जोडीतील एखादा व्यक्ती त्याच्या दुसऱ्या जोडीदाराच्या संमतीने कुणा तिसऱ्याशी Romantic किंवा शारीरिक नाते ठेवत असेल आणि त्या जोडीदारालाच काही फरक पडत नसेल तर इतर येऊन कुणी काही बोलण्याचा काय अधिकार? या नात्यात ज्याला रोखण्याचा अधिकार आहे. मुळात, त्याच्याच समंतीने हा खेळ सुरु असतो तर याला चुकीचे म्हणणे हेच चुकीचे आहे.
Open Marriage पाश्चिमात्य देशांमध्ये दिसून येतो. पण आपल्या देशातील स्वतःला पुढारलेल्या विचाराचे समजणाऱ्या मंडळींनी या ट्रेंडला फॉलो करण्यास सुरुवात केले आहे. आपल्यातील काही लोकांना पाश्चिमात्य संस्कृतीला जपण्याची सवयच झाली आहे. अशांना स्वतःच्या संस्कृतीबद्दल काही माहिती नसते. परंतु, यांना पाश्चिमात्य संस्कृती जपण्याची एक वेगळी हौस असते. Open Marriage हे काही भारतीय संस्कृतीच्या विचारांनी पाहिले गेले तर संपूर्णरीत्या चुकीची पद्धत आहे. पण लोंकाच्या भावनानुसार पाहिले तर काही अर्थे याचे फायद्याच्या गोष्टी आहेत. चला तर मग आपण त्या जाणून घेऊयात:
ओपन मॅरेज तुम्हाला हे समजून घेण्याची संधी देते की, तुम्ही खरोखर तुमच्या नात्यासाठी योग्य आहात का? काही लोक विवाहानंतर स्वतःला जणू कैदेत असल्यासारखे समजतात, ज्यामुळे त्यांना लैंगिक आणि भावनिक समाधानाचा अभाव जाणवतो. अशा परिस्थितीत ओपन मॅरेज तुम्हाला तुमच्या नात्यात आनंदी आहात की इतर कुणासोबत जास्त समाधानी आहात हे जाणून घेण्यास मदत करू शकते. काही रिपोर्ट्स म्हणतात की, ओपन मॅरेजमध्ये असलेली जोडपी भावनिकदृष्ट्या तेवढीच समाधानी होती, जितकी एका नात्यात राहणारी जोडपी असतात. इतकेच नाही तर, ओपन मॅरेजमध्ये असलेल्या लोकांनी जास्त लैंगिक समाधानाचा अनुभव घेतल्याचेही स्पष्ट झाले. जर तुमचा जोडीदार तुमच्या लैंगिक गरजा पूर्ण करण्यास तयार नसेल किंवा तुमच्या सेक्श्युअलिटीबाबत मोकळेपणाने चर्चा करत नसेल आणि तुम्हाला इतरत्र नाते जोडण्याची संमती देत असेल, तर ओपन मॅरेज तुमच्या दोघांसाठी फायद्याचे ठरू शकते.
जरी तुम्ही विचाराने मोकळे असलात, तरीही जर तुमचा जोडीदार दुसऱ्या कुणासोबत वेळ घालवून परत आला, तर तुम्हाला त्याचा हेवा वाटू शकतो. हेवा आणि असूया ही भावना टाळणे खूप कठीण असते. ओपन मॅरेजमुळे अनेकदा जास्त खर्चही होऊ शकतो. इतर व्यक्तींशी डेटिंग करताना ड्रिंक्स, डिनर आणि गिफ्ट्स यांसाठी जास्त पैसे लागू शकतात. त्यामुळे आपल्या बजेटचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते.
तुमच्याकडे कितीही कमी किंवा जास्त पार्टनर असले तरी त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागतो. नियमितपणे डेटिंग, सरप्राईज भेटी किंवा वेळ देणे गरजेचे ठरते. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच, ओपन रिलेशन हे कोणतेही तुटलेले नाते सुधारू शकत नाही. जर एखादे नाते आधीच तोडण्याच्या उंबरठ्यावर असेल, तर ओपन मॅरेज त्याला वाचवू शकत नाही.अनेक वेळा दुसऱ्या नात्यात भावनिक गुंतवणूक अधिक होऊन मुख्य नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे ओपन मॅरेजचा संपूर्ण उद्देशच विफल होतो. अशा परिस्थितीत मानसिक तणाव वाढू शकतो आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, ओपन मॅरेज निवडताना त्याचे फायदे आणि तोटे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.