
फोटो सौजन्य - Social Media
राजेशचे वडील तसे शिक्षित डॉक्टर असल्याने त्यांचा या गोष्टीवर काही विश्वास नसेल, हे त्या रुग्णाला माहीत होते. तसा तो रुग्ण ही पेशाने ज्योतिषी होता, त्यामुळे त्याच्याकडे अदृश्य शक्ती पाहण्याची तसेच ओळखण्याची सिद्धी अगदी जन्मताच अवगत होती. उपचारादरम्यान त्याला त्यांच्या घरी कुणीतरी चालतंय, बोलतंय तसेच शेजारी येऊन बसलाय, असा भास व्हायचा. काही महिन्यांच्या उपचारानंतर त्या ज्योतिष रुग्णाला उत्तम वाटू लागले. त्यामुळे त्याने त्याचा उपचार थांबवला.
दोन वर्षे उलटली. सगळं काही सुरळीत सुरु होतं. आता राजेशच्या वडिलांनी दुसऱ्या ठिकाणी एक छोटं क्लिनिकही सुरु केलं होतं. त्यासाठी त्यांनी शहरात एक जागा घेतली होती. त्याठिकाणी अगदी आधीसारखीच रुग्णांची गर्दी होती. एकेदिवशी ते ज्योतिष रुग्ण त्यांना पुन्हा त्रास सुरु झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी राजेशच्या वडिलांच्या नव्या क्लिनिकवर दाखल झाले. तेव्हा त्या ज्योतिष रुग्णाला वाटले असावे की त्यांनी तो घर सोडला असावा त्यामुळे त्यांनी घडलेली ती संपूर्ण बाब आणि त्या अदृश्य शक्तीचा घरी असलेला वावर डॉक्टरांना सांगितला. डॉक्टरांचा या गोष्टीवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी लवकरच घर खाली केले.
राजेश तसा वयाने लहान होता. त्याला ते घर सोडायचे नव्हते पण आई-वडिलांच्यापाई त्यालाही घर सोडावे लागले. ते घर त्यांनी ठाण्यात राहणाऱ्या अशा व्यक्तीला विकले, जो त्याच्या आई-वडिलांसाठी घर पाहत होता. त्या व्यक्तीचे नाव अब्बास होते. अब्बासचे आई वडील त्या फ्लॅटवर राहायला आहे आणि अगदी महिनाभरात अब्बासचे धडधाकट वडिलांचे निधन झाले. आता एकट्या आईला का तिथे ठेवायचं? म्हणून अब्बासने ते फ्लॅट तिसऱ्याला विकले आणि आईला त्याच्यासोबत ठाण्याला ठेवले.
तिसऱ्या व्यक्तीचे नाव निकम होते. निकम कुटुंबाने त्या फ्लॅटचा ताबा घेतला आणि महिनाभरातच त्यांच्या कुटुंबातही मृत्यूने खेळ रचला. दोन धडधाकट जणं पाठोपाठ मृत्यू गेले. एकंदरीत, त्या घरात घडणाऱ्या गोष्टी जेव्हा ज्योतिषाला कळली तेव्हा त्यांनी राजेशच्या वडिलांना सांगितले की त्या घरात राहणाऱ्या अदृश्य शक्तीला फक्त तुम्हीच त्या घरात हवे आहात. त्याला तुमचीच ओढ आहे. त्याच्याकडून जमीन हिसकावून घेऊन पूर्वी या ठिकाणी इमारत बांधण्यात आली होती. नेमके तिथेच तुम्ही राहायला आलात पण त्याने तुमच्याशी शत्रुता घेतली नाही, तो तुमच्या कुटुंबात मिसळून गेला. पण तुम्ही दुसऱ्या कुणाला घर विकून जे कृत्य केलंय याने तो प्रचंड चिडला आहे आणि त्यामुळे तो तिथे येणाऱ्या नव्या कुटुंबांना जगू देत नाही आहे.
ही कथा आजही वाचून अंगावर शहारे आणते. पण भुतांनाही भावना असतात, भुतांचाही एखाद्यात जीव गुंततो, अशा गोष्टी वाचण्यात येणे हे एक प्रकारचे नवलच आहे.
टीपः हा लेख केवळ मनोरंजन आणि माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा Navarashtra.com चा हेतू नाही.