ऋजुता दिवेकरने सांगितला करिना कपूर खानचा डाएट प्लॅन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फिटनेससाठीदेखील ओळखली जाते. करिनानेच साईज झिरोला प्रसिद्धी दिली आणि आई झाल्यानंतरही करिनाला आपली पूर्वीची फिगर परत मिळवली. करिनाला पाहून चाहतेही आश्चर्यचकित होतात की करीना स्वतःला कसे इतके फिट ठेवते.
खरं तर, करीना तंदुरुस्त राहण्यासाठी योगा किंवा व्यायाम करते आणि तिच्या डाएटचीदेखील काळजी घेते. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत, करिनाच्या न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी करिनाच्या डाएटबद्दल सांगितले. ऋजुता यांनी करीना नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात काय खाते हे सांगितले. ऋजुता दिवेकर यांनी सांगितले की करीना गेल्या १८ वर्षांपासून म्हणजेच २००९ पासून हा डाएट फॉलो करत आहे आणि ती ते सातत्याने जपत आली आहे, जाणून घ्या करिनाचा संपूर्ण डाएट प्लान (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
करीना कपूरचे डाएट
ऋजुता दिवेकरने सांगितले की करीनाला सेटवर डाळ-भात खायला आवडते आणि ती सहसा दुपारच्या जेवणात चपाती आणि भाजी खाते. ऋजुता यांनी असेही सांगितले की करीना आठवड्यातून चार वेळा खिचडी आणि तूप खाते आणि तिला दालखिचडी प्रचंड आवडते. तिच्या डाएटचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि काही महिन्यांपूर्वी हीच गोष्टी खुद्द करिनानेदेखील सांगितली होती.
Corona: लॉकडाऊन दरम्यान ऋजुता दिवेकरने दिला होता परफेक्ट डाएट प्लॅन, प्रतिकारशक्ती वाढेल पटकन
करीना कपूरने जेवणाबद्दल सांगितले
करीनाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की तिचा घरात काम करणारा आचारीही तिच्यावर नाराज आहे कारण करीनासाठी १० ते १५ दिवस सतत एकाच प्रकारचे अन्न शिजवले जाते. तेच डाळ भात किंवा दही भात. कुकदेखील विचारतो की मी नक्की काय शिजवत आहे. करीनाने म्हटले होते, “आठवड्यातून ५ दिवस खिचडी खाल्ल्यानंतरही मी आनंदी राहू शकते. चमचाभर तूप घालून दालखिचडी खाल्ल्यानंतर मला आनंद मिळतो आणि पोटही भरतं.”
करीना योगादेखील करते
करीना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करते. योगा हा करीनाच्या आयुष्याचा एक भाग आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला आवडतात पण योगा हा तिच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. करीना कपूर गेल्या १० वर्षांपासून योगा करत आहे. योगाव्यतिरिक्त, करीना पिलेट्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि श्वासोच्छवासाचे व्यायामदेखील करते. यामुळेच ती चाळिशीनंतरही तरूण दिसते आणि अत्यंत फिट आहे. तसंच २ मुलांची आई आहे असं कोणीही म्हणणार नाही.
सामान्य माणसालाही डाएट फॉलो करायचं असेल तर करिनाची न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर आपल्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत माहिती देत असते आणि त्याचा तुम्ही उपयोगही करून घेऊ शकता. घरातील अत्यंत साध्या जेवणाने तुम्ही तुमचा फिटनेस सांभाळू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.