Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांनाच काय तर तुमच्याही मनाला खुश करून जाईल हा टेस्टी ‘चॉकलेट सँडविच’; नोट करा 10 मिनिटांची रेसिपी

Chocolate Sandwich Recipe : चॉकलेट तर सर्वांनाच खायला फार आवडतं पण तुम्ही कधी चॉकलेट सँडविचची चव चाखली आहे का? नसेल तर आजच याची रेसिपी वाचा आणि घरी ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2025 | 01:41 PM
लहान मुलांनाच काय तर तुमच्याही मनाला खुश करून जाईल हा टेस्टी 'चॉकलेट सँडविच'; नोट करा 10 मिनिटांची रेसिपी

लहान मुलांनाच काय तर तुमच्याही मनाला खुश करून जाईल हा टेस्टी 'चॉकलेट सँडविच'; नोट करा 10 मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:

आजच्या धावपळीच्या जगात पटकन आणि चविष्ट काहीतरी खाण्याची इच्छा झाली की लगेच लक्षात येतो तो सॅंडविच. पण साधं सॅंडविच नाही, तर गोड, मुलांना खास आवडणारं, चॉकलेट सॅंडविच. लहान मुलं असो की मोठे, चॉकलेटचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. नाश्त्यासाठी, डबे पॅक करताना किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी हा सॅंडविच उत्तम पर्याय आहे.

इटालियन पदार्थाला देसी टच, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा मसालेदार ‘मॅक्रोनी पास्ता’

चॉकलेट सॅंडविच बनवायला खूप सोपं असतं आणि त्यासाठी खूप साहित्यही लागत नाही. घरच्या घरी उपलब्ध ब्रेड, बटर आणि चॉकलेट स्प्रेड वापरून तुम्ही काही मिनिटांत हॉटेलसारखा टेस्टी सॅंडविच बनवू शकता. त्यात थोडं क्रंचीपणा आणण्यासाठी ड्रायफ्रूट्स, बनाना स्लाइस किंवा किसलेलं चॉकलेट वापरलं तर त्याची चव आणखीनच वाढते. हा सॅंडविच मुलांना शाळेत डब्यात द्यायला पण एकदम बेस्ट आहे. पटकन होतो, पौष्टिक आहे आणि गोड खाण्याची इच्छा पूर्ण करतो. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी बनणारी ही चॉकलेट सॅंडविच रेसिपी.

साहित्य

  • ब्रेड स्लाइस – ४
  • बटर – २ चमचे
  • चॉकलेट स्प्रेड / नुटेला – ३-४ चमचे
  • किसलेलं डार्क/मिल्क चॉकलेट – २ चमचे
  • कापलेले ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू, अक्रोड) – २ चमचे
  • (ऐच्छिक) केळाचे पातळ स्लाइस – ४-५
थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी नाचणीचे सूप, शरीरात कायमच टिकून राहील ऊर्जा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम ब्रेडच्या स्लाइसच्या एका बाजूला बटर लावून घ्या.
  • आता एका स्लाइसवर चांगला थर देऊन चॉकलेट स्प्रेड पसरवा.
  • त्यावर थोडं किसलेलं चॉकलेट आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स शिंपडा.
  • हवे असल्यास काही केळाचे स्लाइस ठेवले तरी चालतील, त्यामुळे चव अजून मस्त लागते.
  • दुसरी ब्रेड स्लाइस त्यावर ठेवून हलकेच दाबा.
  • आता सॅंडविच टोस्टर/गॅसवरील तव्यावर दोन्ही बाजूनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार चॉकलेट सॅंडविच गरमागरम कापा आणि सर्व्ह करा.
  • हा सॅंडविच तुम्ही गरम टोस्टेड किंवा थंड (चिल्ड) डिझर्टसारखा सुद्धा खाऊ शकता.
  • लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी ही डिश परफेक्ट आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

चॉकलेट सँडविचसाठी कोणत्या प्रकारचे चॉकलेट वापरले जाते?
चॉकलेट सँडविच डार्क चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेट किंवा अगदी सेमी स्वीट चॉकलेट वापरून बनवता येते.

चॉकलेट सँडविचचे फायदे काय आहेत?
डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त असते आणि ते खूप पौष्टिक असते. ते अँटिऑक्सिडंट्सचा एक शक्तिशाली स्रोत आहे आणि रक्त प्रवाह सुधारू शकतो आणि रक्तदाब कमी होऊ शकतो.

Web Title: Know how to make tasty chocolate sandwich at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Chocolate
  • marathi recipe
  • Sandwich

संबंधित बातम्या

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
1

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
2

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
3

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.