थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी नाचणीचे सूप
संपूर्ण देशभरात पाऊस पडत आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरतात. साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरात कायमच थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचे सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. नाचणी बाजारात सहज उपलब्ध होते. नाचणीमध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य कायमच निरोगी राहते. रोजच्या आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन नियमित करावे. नाचणीचे सूप विशेष करून महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे भूक लागल्यानंतर कोणताही तिखट तेलकट पदार्थ खाण्याऐवजी नाचणीचे सूप बनवून प्यावे. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
नवरात्रीच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रताळ्याचा हलवा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ
इटालियन पदार्थाला देसी टच, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा मसालेदार ‘मॅक्रोनी पास्ता’