पावसाळ्यात निरोगी आरोग्यसाठी 'या' टिप्स फॉलो करा
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, गेस्ट्रो यांसारखे आजार वाढतात. या आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये अनेक लोक बाहेर फिरण्यासाठी जातात. रस्त्यावर विकत मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करतात. यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. रस्ते घरांच्या आजूबाजूला साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यू, मलेरियाच्या डासांची पैदास झाल्यानंतर आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होतो.सर्दी, खोकला, ताप येणे, सतत डोकं दुखणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे साथीच्या आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: लहान मुलांच्या मजबूत हाडांसाठी आहारात करा ‘या’ कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश
पावसाळ्यात शारीरिक स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील आजूबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका. घरातून बाहेर जाताना आणि घरी असल्यावर मच्छर प्रतिबंधक क्रीम लावा. या दिवसांमध्ये जास्त घट्ट कपडे घालण्यापेक्षा सैल आणि श्वास घेण्यास जास्त होणार नाही असे कपडे घाला. आठवड्यातून एकदा नख कापून ती स्वच्छ करा.
पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर बाहेर मिळणारे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले ताजे अन्नपदार्थ खावेत. यामुळे आरोग्याला फायदेच होतात. रस्त्यावर बनवलेले किंवा शिळे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे पोटासंबंधित आजार होण्याची भीती असते. या दिवसांमध्ये आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करा.
रोज सकाळी उठल्यानंतर 30 ते 45 मिनिटं व्यायाम केल्यामुळे शरीर निरोगी राहते. एका जागेवर जास्त वेळ बसून राहिल्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
हे देखील वाचा: हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात करा लाल नाशपातीचा समावेश, ह्रदय राहील निरोगी
पावसाळा सुरु झाल्यानंतर आणि सुरु होण्याच्या आधी लसीकरण करणे आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा सारख्या गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा आजार झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. तसेच कोणतीही औषध घेताना डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.