Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेंदू आणि रक्‍तातील ग्लुकोजचा संबंध? अल्झायमर, Diabetes आणि CGM यांच्‍यामधील समान दुवा, तज्ज्ञांचा खुलासा

रक्तातील ग्लुकोज आणि मेंदू यांचा परस्पर काही संबंध आहे का? तज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. वयासह काही बदल जर झाले तर स्मरणशक्तीशी संबंधित त्रास हे नक्कीच गंभीर आहेत, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 13, 2026 | 06:47 PM
मेंदू आणि रक्तातील ग्लुकोजचा काय संबंध (फोटो सौजन्य - iStock)

मेंदू आणि रक्तातील ग्लुकोजचा काय संबंध (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • मधुमेही व्यक्तींसाठी कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे महाग ठरते 
  • मेंदू आणि रक्तातील ग्लुकोजचा काय संबंध 
  • किती गंभीर आहे ही समस्या 
वाढत्‍या वयासह शरीरात काही बदल होणे स्वाभाविक आहे, जसे सांधे कडक होणे किंवा एखादी गोष्ट आठवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागणे. पण स्‍मरणशक्‍ती सतत कमी होते किंवा विसरपणामुळे दैनंदिन जीवनात अडथळे येऊ लागतात तेव्‍हा ते गंभीर समस्‍येचे लक्षणे असू शकते. अल्झायमर डीसीज हा हळूहळू वाढत जाणारा मज्जासंस्थेचा विकार आहे. जगभरातील ५० दशलक्षहून अधिक व्‍यक्‍ती आणि एकट्या भारतात जवळपास ४ दशलक्षहून अधिक व्‍यक्‍ती या आजाराने पीडित आहेत. 

मधुमेही व्यक्‍तींच्या मेंदूच्या आरोग्याचे संरक्षण करताना एका महत्त्वाच्या घटकाकडे अनेकदा दुर्लक्ष होते, ते म्हणजे रक्‍तातील ग्‍लुकोजमध्‍ये स्थिरता. उदयोन्मुख संशोधनामधून आता इन्सुलिन रोधकता आणि संज्ञानात्मक ऱ्हास यांच्यात स्पष्ट संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे. खरेतर, मेंदूतील इन्सुलिनच्या बिघडलेल्या कार्यामुळे काही शास्त्रज्ञ अल्झायमरला ‘टाइप ३ मधुमेह’ असे देखील म्‍हणतात. मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी, विशेषतः वृद्धांसाठी हा संबंध तातडीचा प्रश्‍न निर्माण करतो: संज्ञानात्मक कार्यक्षमतेचे संरक्षण करण्यासाठी आपण रक्तातील साखरेचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कसे करू शकतो? 

काय सांगतात तज्ज्ञ

मुंबईतील ए स्‍वीट लाइफचे कन्‍संल्‍टंट डायबेटोलॉजिस्‍ट व फॅमिली फिजिशियन डॉ. मिखिल कोठारी म्‍हणाले, ”विशेषतः वृद्धांमध्ये रक्‍तातील साखरेमधील अस्थिरता मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते, हे आता आपल्याला समजले आहे. कन्टीन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगमुळे आपल्याला रक्‍तातील साखरेच्‍या पातळ्यांमधील चढ-उतारांवर अचूकपणे देखरेख ठेवण्‍यासह व्‍यवस्‍थापन करता येते. या माहितीमुळे आपल्याला वेळीच हस्तक्षेप करण्याची संधी मिळते, ज्यामुळे मेंदूतील इन्सुलिन रोधकामुळे होणारा संज्ञानात्मक परिणाम मंदावण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, सीजीएममध्ये अलार्म सेट करता येते, जे रक्‍तातील साखरेची पातळी खूप कमी किंवा जास्त झाल्यास तुम्हाला सावध करतात, ज्यामुळे जलदपणे व सुरक्षितपणे कृती करता येते.” 

वैयक्तिक माहिती देण्‍याव्‍यतिरिक्‍त सीजीएम तंत्रज्ञानामध्‍ये मधुमेहासंदार्भात घेतल्या जाणाऱ्या काळजीमध्‍ये परिवर्तन घडवून आणले आहे, जेथे केअरगिव्‍हर्स आणि आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांना रिअल टाइममध्‍ये डेटा शेअर करता येतो. यामुळे सतत पाठिंबा मिळण्‍याचे चक्र तयार होते, जे विशेषत: वृद्धांसाठी किंवा संज्ञानात्‍मक ऱ्हासाची लवकर लक्षणे अनुभवणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी उपयुक्‍त आहे. अन्‍यथा अशा व्‍यक्‍तींना स्‍वत:हून नियमितपणे रक्‍तातील साखरेच्‍या प्रमाणावर देखरेख ठेवणे अवघड जाऊ शकते. 

‘ही’ 5 लक्षणे दिसली तर समजून जा, तुमच्या मेंदूत बनत आहे रक्ताच्या गुठळ्या

CGM बाबत महत्त्वाची माहिती 

दक्षिण आशियामधील Abbott च्‍या डायबिटीज केअर बिझनेससाठी मेडिकल अफेअर्सचे प्रमुख डॉ. विवेक अय्यर म्‍हणाले, ”सीजीएम सारखे स्‍मार्ट तंत्रज्ञान मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये परिवर्तन घडवून आणत आहे, जेथे स्‍वत:हून देखरेख करण्‍यापेक्षा अधिक सुविधा देत आहेत. हे तंत्रज्ञान रूग्‍ण, केअरगिव्‍हर्स आणि आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांमध्‍ये महत्त्वपूर्ण संबंध निर्माण करतात. एखादा दुरून मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करत असेल किंवा स्‍मरणशक्‍ती कमी होण्‍याच्‍या आव्‍हानांचा सामना करत असेल तर त्‍यांच्‍या सपोर्ट नेटवर्कला माहिती मिळू शकते, ज्‍यासह ते त्‍वरित कृती करू शकतात. ही रिअल-टाइम कनेक्‍टीव्‍हीटी रक्‍तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्‍यामध्‍ये अनुकूल फरक घडवून आणू शकते, परिणामत: मेंदूचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते.”

अल्झायमरचा धोका आणि संज्ञानात्मक वृद्धत्व यांच्या संदर्भात, सीजीएम डिवाईसेस रक्‍तातील साखरेच्‍या पातळीवर देखरेख ठेवण्‍यासोबत खऱ्या अर्थाने सक्रिय काळजीसाठी लाइफलाइन ठरतात. रिअल-टाइम डेटाद्वारे डिवाईसेस कुटुंबं आणि वैद्यकीय टीमला सक्षम बनवतात, ज्‍यामुळे ते वेळीच पावले उचलून रुग्णाच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. 

मेंदूमधील इन्‍सुलिन रोधकता अल्‍झायमरमधील प्रमुख घटक असू शकतो 

संशोधनामधून आता निदर्शनास आले आहे की, स्‍मरणशक्‍ती कमी होणे आणि मधुमेह यांच्‍यामध्‍ये प्रबळ संबंध आहे. टाइप २ मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींना अल्‍झायमर होण्‍याचा उच्‍च धोका आहे आणि टाइप १ मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींना वाढत्‍या वयासह स्‍मरणशक्‍ती कमी होण्‍याचा धोका आहे. संशोधनामधून निदर्शनास येते की, मेंदूतील इन्सुलिन रोधकता मेंदूच्या ग्लुकोज वापरण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण करते. मेंदूला ऊर्जा न मिळणे हे अल्झायमरची सुरुवात होण्याचे महत्त्वाचे कारण असू शकते. 

रक्‍तामध्‍ये साखरेचे प्रमाण वाढल्‍यास मेंदूमध्‍ये हानीकारक प्रथिने वाढू शकतात

रक्तातील साखरेची पातळी सतत वाढलेली राहणे आणि मेंदूमध्ये ‘बीटा-अमायलोइड’ नावाच्या प्रथिनाचे प्रमाण वाढणे यांचा जवळचा संबंध आहे. हे प्रथिन अल्झायमर आजाराचे मुख्य लक्षण मानले जाते. ही प्रथिने मेंदूच्या पेशींमधील परस्पर संवाद खंडित करतात, ज्यामुळे स्मरणशक्‍ती आणि विचार करण्याची क्षमता वेगाने कमी होऊ लागते. या संबंधामुळे आता अनेक तज्ञ अल्झायमरला ‘टाइप ३ मधुमेह’ असे म्‍हणू लागले आहेत.

सीजीएम (कन्टिन्‍युअल ग्‍लुकोज मॉनिटरिंग) 

हे तंत्रज्ञान मधुमेहामधील गुंतागुंतीवर प्रतिबंध ठेवण्‍यासह अधिक मदत करते. फ्रीस्‍टाइल लिब्रे २+ सारखी सीजीएम डिवाईसेस रिअल टाइममध्‍ये रक्‍तातील साखरेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवतात, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना त्‍यांचा आहार, क्रियाकलाप, झोप व तणावाचा रक्‍तातील साखरेच्‍या पातळ्यांवर होणारा परिणाम समजतो. मधुमेही व्‍यक्‍तींसाठी हे डिवाईसेस गुंतागुंतीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासह दीर्घकाळापर्यंत संज्ञानात्‍मक समस्‍यांचा धोका कमी करण्‍यामध्‍ये देखील मदत करू शकतात. 

मेंदूसाठी पोषक आहार रक्‍तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास आणि स्मृतिभ्रंशाचा धोका कमी करण्यास मदत करतो. माइंड (मेडिटेरिनियअन-डॅश इंटरव्‍हेंशन फॉर न्‍यूरोडिजनरेटिव्‍ह डिले) सारख्या आहारपद्धती हिरव्या पालेभाज्या, बेरी, कडधान्ये आणि आरोग्‍यदायी फॅट्सवर भर देतात. हे पदार्थ हृदयाचे आरोग्‍य आणि चयापचय क्रिया उत्तम ठेवण्‍यासोबत स्‍मरणशक्‍ती लवकर कमी होण्‍याचा वेग मंदावण्यास देखील मदत करू शकतात. तसेच, आंबवलेले सोयाबीन आणि फायबरयुक्त भाज्यांसारखे पचनसंस्थेला अनुकूल असलेले पदार्थ गट-ब्रेन अॅक्सिसद्वारे मेंदूच्या कार्याला प्रबळ करतात. 

जीवनशैलीत लवकर बदल आणि रिअल-टाइम डेटा नवीन आशेचा किरण देतात 

अल्‍झायमरवर आतापर्यंत कोणताच उपचार उपलब्‍ध नाही, पण लनवकर प्रतिबंध आणि सक्रिय केअर फरक घडवून आणू शकतात. सीजीएमच्‍या माध्‍यमातून रक्‍तातील साखरेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवणे, तसेच आहारामध्‍ये बदल आणि शारीरिक व्‍यायाम यामुळे व्‍यक्‍तींना व कुटुंबांना अल्‍झायमर व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍यासोबत त्‍यांचे प्रमाण कमी करण्‍यास मदत होऊ शकते.  

मधुमेह आणि स्‍मरणशक्‍ती कमी होणे यांच्‍यामधील संबंध वाढत असताना स्‍पष्‍टपणे दिसून येत आहे की रक्‍तातील साखरेच्‍या पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन करणे हे मधुमेहामधील गुंतागुंतींचे प्रतिबंध करण्‍यासह मेंदूचे कार्य, आत्‍मनिर्भरपणा आणि जीवनाचा दर्जा यांचे जतन करण्‍याबाबत आहे.

15 वर्ष मेंदूवर रिसर्च, तल्लख होण्यासाठी डॉक्टरने सांगितले काय खावे; मुलांचा मेंदू धावेल १०० च्या वेगाने

Web Title: Relationship between brain and blood glucose similar link between alzheimer diabetes and cgm experts reveal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • brain
  • diabetes
  • Health Tips

संबंधित बातम्या

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक
1

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
2

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?
3

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय ‘या’ आजारांचे संकेत
4

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय ‘या’ आजारांचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.