Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा

कर्करोग उपचार अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी भारताने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील ‘समाकलन 2.0’ परिषदेत एकात्मिक कर्करोग उपचाराचा स्पष्ट रोडमॅप मांडण्यात आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 14, 2026 | 12:03 PM
कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • कर्करोग उपचारात भारत आता मोठे पाऊल घेत आहे.
  • कर्करोगावरील उपचार आता फक्त औषधानेच नाही तर आयुर्वेदाच्या साहाय्यानेही केले जाणार आहे.
  • रुग्णकेंद्रित कर्करोग उपचारासाठी आयुष-ऍलोपॅथी समन्वयाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
कर्करोगावरील उपचार आता केवळ आधुनिक औषधोपचारांपुरते मर्यादित न राहता आयुर्वेद आणि अन्य आयुष पद्धर्तीच्या सहाय्याने अधिक परिणामकारक करण्याच्या दिशेने भारताने ठोस पाऊल टाकले आहे. नवी मुंबईतील ऍक्ट्रेक-टाटा स्मारक केंद्रात आयोजित ‘समाकलन २.०’ राष्ट्रीय एकात्मिक कर्करोग उपचार परिषद’ या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरली असून, ऍलोपॅधीबरोबर आयुर्वेदाचा संगम साधत रुग्णकेंद्रित आणि सर्वसमावेशक उपचार पद्धती विकसित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कर्करोग प्रतिबंध, उपचार आणि उपचारानंतरच्या काळात आयुष प्रणालींचा आधुनिक कर्करोग उपचारांसोबत पुराव्यावर आधारित वापर कसा करता येईल, यावर या परिषदेत सखोल चर्चा झाली. कर्करोग उपचारासाठी आयुष अंतर्गत औषध शोध आणि विकास उत्कृष्टता केंद्राच्या मार्गदर्शनाखाली, सीसीआरएएसच्या सहकार्याने आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या पाठिंब्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

‘नेचरकॅन’ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटाबेसचे लोकार्पण

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पॅक्ट्रेकमध्ये विकसित करण्यात आलेल्या ‘नेचरकॅन’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटाबेसचे लोकार्पण करण्यात आले. औषधी वनस्पतींच्या कर्करोग प्रतिबंध उपचारावरील वैज्ञानिक साहित्यावर आधारित हा डेटाबेस संशोधकांसाठी महत्वाचे साधन ठरणार आहे, परंपरा आणि नवकल्पना यांचा संगम साधत, ऍलोपॅथीसह आयुर्वेदाचा वापर करून कर्करोगावर अधिक प्रभावी उपचार शक्य असल्याचा विश्वास या परिषदेतून व्यक्त करण्यात आला असून, समाकलन २.० परिषद भारतातील एकात्मिक कर्करोग उपचार क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

एकात्मिक आरोग्यसेवा ही काळाची गरज

टाटा स्मारक केंद्रचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बड़वे यांनी पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधणारी एकात्मिक आरोग्यसेवा ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. पुराव्यावर आधारित आयुष उपचारांमुळे रुग्णांची उपचार सहनाशक्ती वाढते, जीवनमान सुधारते आणि मानक कर्करोग उपचारांना पूरक आधार मिळतो, असे त्यानी स्पष्ट केले. पॅक्ट्रेकचे सवालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी आयुष आधारित उपचाराचे शास्त्रीय मूल्यमापन करण्यासाठी ऍक्ट्रेकमध्ये इन-सिलिको, इन-विट्री, व्यवस्था उभारण्यात आल्याची माहिती दिली. इन-विवों आणि क्लिनिकल संशोधनाची मजबूत व्यवस्था उभारण्यात आल्याची माहिती दिली.

डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री, गोवा) म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र नेतृत्वाखाली आयुष उपचारांना आधुनिक वैद्यकासोबत जोडण्याचे प्रयत्न सुरू असून, टाटा मेमोरियल सेंटर आणि ऑल इंडिया इर्नस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, गोवा यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने सर्वसामान्यांसाठी सर्वांगीण कर्करोग उपचार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे”.

वास्तव अभ्यास आवश्यक

आयुष केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. विक्रम गोटा यानी आयुषमधील संभाव्य उपचार घटकांची ओळख, त्यांची कार्यपद्धती, सुरक्षितता आणि परिणामकारकता यांचा सखोल अभ्यास सुरू असल्याचे नमूद केले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ayurveda integration cancer treatment tata memorial samakalan 2 lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • cancer
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय
1

Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
2

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट
3

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे
4

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.