नसांमधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे पेय प्यावे
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हल्ली धावपळीच्या जीवनात जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. सतत बाहेरचे तेलकट पदार्थ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप इत्यादीचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. सतत तेलकट पदार्थ खात राहिल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागली आहे. तसेच मानवी शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येते. त्यातील शरीरात जमा झालेले चांगले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तर खराब कोलेस्ट्रॉल साचू लागल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो आहारात कमी तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन करावे.
खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. तसेच शरीरात उच्च रक्तदाब वाढतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन सदृढ आणि निरोगी जीवन जगले पाहिजे. रक्तवाहिन्यांमध्ये चिटकून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात लसूण, बीट इत्यादी अनेक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला नसांमध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे सेवन करावे? हे पेय प्यायल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात? जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: नारळ पाण्याचे अतिसेवन ठरेल आरोग्यासाठी घातक! जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
आवळे, गाजर, मध, पाणी
हे देखील वाचा: जीभ दाखवा, आजार ओळखा! वैज्ञानिकांनी शोधले अनोखे तंत्र
ज्यूस प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे:
शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात गाजर आवळ्याच्या ज्यूसचे सेवन करावे. गाजरमध्ये असलेले गुणकारी घटक नसांमधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच आवळ्याचे सेवन केल्यामुळे नैसर्गिकरित्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. रिकाम्या पोटी या ज्युसचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. निरोगी हृदयासाठी रोजच्या आहारात या ज्युसचा समावेश करा. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.