जिभेवरून आजार ओळखण्याचे तंत्र
शतकानुशतके वैद्य नाडी पाहून आणि जीभ पाहून आजाराबाबत सांगत होते. मात्र नंतर काळ बदलू लागला. आधुनिकतेच्या आंधळ्या शर्यतीत लोक धावू लागले. दिवसेंदिवस समाजाचा विकास होऊ लागला, त्यासोबत आपल्या आजूबाजूच्या गोष्टीही हळूहळू बदलत गेल्या. विकासाच्या या शर्यतीत आपण काही गमावले असेल तर ती आपली प्राचीन वैद्यकीय पद्धत होती.
पण आता हीच जुनी पद्धत अर्थात अशी वैद्यकीय प्रथा पुन्हा आपल्या आयुष्यात येणार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची जीभ पाहून, आर्टिफिशियल इंटिलिजन्स (AI) द्वारे मशीन त्याच्या आजारांचे अचूक निदान करेल. हे केवळ आजारांना लवकर सांगण्यात मदत करेल असे नाही तर वारंवार रक्त तपासणी करण्यापासूनदेखील वाचवेल. इराकच्या मिडल टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या संशोधनामुळे हे शक्य होणार आहे. (फोटो सौजन्य – iStock)
विकसित AI मॉडेल
अलीकडे, इराकच्या मिडल टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक एआय मॉडेल विकसित केले आहे जे जिभेच्या चित्रांवरून 98 टक्के अचूकतेसह नक्की कोणता आजार आहे हे ओळखू शकते. हे तंत्रज्ञान रिअल टाइममध्ये जीभेच्या फोटोचे विश्लेषण करते आणि जलद आणि अचूक परिणाम देते. जर हे तंत्रज्ञान पूर्णपणे यशस्वी झाले, तर कोणताही आजार शोधणे ही काही मिनिटांची बाब असेल आणि लवकरात लवकर आजाराचे निदान करता येईल.
हेदेखील वाचा – खोकल्यामुळे आवाज बसला असेल तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा,आवाज होईल पहिल्यासारखा
जिभेचा रंग आणि पोत सांगेल आजार
जिभेच्या रंगावरून आजाराची मांडणी
या तंत्राचा पाया प्राचीन चिनी वैद्यकीय पद्धतीवर आधारित आहे, जिथे डॉक्टर जिभेचा रंग आणि संरचनेवर आधारित आजारांचे निदान करायचे. आधुनिक विज्ञानाने हे प्राचीन ज्ञान प्रगत AI मॉडेलशी जोडून आणखी चांगले आणि परिणामकारक केले आहे.
कशी झाली चाचणी
युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया आणि इराकच्या मिडल टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एकत्रितपणे हे एआय मॉडेल तयार केले आहे, ज्याची चाचणी 5,260 जीभेच्या फोटोंवर करण्यात आली आहे. या चित्रांचे विविध रोगांच्या लेबलांसह विश्लेषण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – तरूणांमधील Cancer चे सुरुवातीचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडेल महागात
डायबिटीस-कॅन्सर रूग्णांची जीभ
जिभेचा रंग सांगेल आजार
संशोधनात असे आढळून आले आहे की मधुमेहाने ग्रस्त रूग्णांची जीभ बहुतेक वेळा पिवळी असते, तर कर्करोगाच्या रुग्णांची जीभ जांभळ्या रंगाची असते आणि तिच्यावर जाड थर असतो. तीव्र स्ट्रोकमुळे प्रभावित झालेल्या लोकांची जीभ लाल रंगाची असते आणि तिचा आकार विचित्र असतो.
AI मॉडेलला अशा चित्रांचे विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, त्यामुळे हे मॉडेल रोगाचा लवकर आणि अचूक अंदाज लावू शकतात. हे तंत्रज्ञान ज्या आजारांची लक्षणे जिभेवर स्पष्टपणे दिसतात ते ओळखण्यास सक्षम आहे.
फोनच्या कॅमेऱ्याचाही उपयोग
हे तंत्रज्ञान केवळ अधिक अचूकता प्रदान करत नाही तर ते सामान्य स्मार्टफोन कॅमेऱ्यांसहदेखील लागू केले जाऊ शकते. याच्या मदतीने पारंपरिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागातही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. सुरुवातीच्या अवस्थेत कोणता आजार आहे हे शोधून, या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी उपचार करणे शक्य आहे आणि साथीच्या रोगांसारख्या परिस्थितीत त्वरीत पावले उचलली जाऊ शकतात असाही दावा करण्यात आला आहे.
संदर्भ