Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ गावात कुत्रा, मांजरी नाही तर बिबट्याला पाळतात, असं एक गाव जिथे बिबट्या आणि माणसं एकत्र राहतात

असं एक गाव आहे जिथे बिबट्याचा वावर कुत्र्या मांजराप्रमाणे मुक्त असतो आणि माणसांना हा बिबट्या काहीही करत नाही. या गावात माणसं आणि बिबट्या एकत्र आणि शांततेत जगतात. कोणतं आहे हे गाव जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 20, 2025 | 06:50 PM
‘या’ गावात कुत्रा, मांजरी नाही तर बिबट्याला पाळतात, असं एक गाव जिथे बिबट्या आणि माणसं एकत्र राहतात
Follow Us
Close
Follow Us:
  • गावात कुत्रा, मांजरी नाही तर बिबट्याला पाळतात
  • जमिनीचे रक्षक म्हणून बिबट्याची करतात पूजा
  • असं एक गाव जिथे बिबट्या आणि माणसं एकत्र राहतात
राज्यभरात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. कोकण, पश्चिम महराष्ट्रासह आता ठाणे शहारात देखील बिबट्याचा वावर होत असल्याचं दिसून येत आहे. बिबट्याच्या हल्यात शेतकऱ्यांच्या गुरांचं जसं नुकसान झालं तसंच काही माणसं देखील बिबट्याच्या हल्यात जखमी झाली तर काही जिवानीशी गेली. त्यामुळे राज्यभर बिबट्याने जो हौदोस माजनला त्यामुळे ग्रामीण आणि शहारी भागात नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र असं एक गाव आहे जिथे बिबट्याचा वावर कुत्र्या मांजराप्रमाणे मुक्त असतो आणि माणसांना हा बिबट्या काहीही करत नाही. या गावात माणसं आणि बिबट्या एकत्र आणि शांततेत जगतात. कोणतं आहे हे गाव जाणून घेऊयात.

राजस्थानमध्ये अरावली पर्वतात वसलेलं बेडा हे गाव खास बिबट्यांसाठी ओळखलं जातं. या गावात बिबट्या रानावनात किंवा घनदाट अभयारण्यात नाही तर माणसांच्या वस्तीत आणि गावात यांचा मुक्त संचार असतो. बिबट्याचा हा संचार आता आताचा नव्हे तर तो कित्येक पिढ्यांचा आहे. बिबट्या इथल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहिले आहेत.

अनोखा टेलिफोन ‘बूथ’ जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो… हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या

विशेष म्हणजे,गेले कित्येक दशकांपासून इथे बिबट्या हल्यात एकही मानवी मृत्यूची नोंद नाही. यागावात बिबटे मंदिरांच्या गुहांजवळ दिसतात, तेव्हा स्थानिक लोक त्यांना जमिनीचे रक्षक म्हणून त्यांचा आदर करतात. त्यांना मान देतात. एवढंच नाही तर देवाचं रुप मानून त्यांचा आशीर्वाद घेतात. या गावातल्या रबारी समाजाने पिढ्यानपिढ्या बिबट्याशी असलेलं नातं जपलं आहे. या समाजाची माणसं बिबट्याच्या हल्ल्यामुळे गुरांचं झालेलं नुकसान देखील सहन करतात.

अरवलीच्या टेकड्यांमध्ये वसलेलं ‘बेडा’ खास बिबट्यांसाठी ओळखलं जातं. जिथे 50 हून अधिक बिबटे जंगलात नाही, तर घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि शेतांमध्ये मोकळेपणाने वावरतात. यांचा वावर मुक्त असून ना कोणती कुपणं, न कोणती भीती असते. रबारी समाजाकडून बिबट्यांना कोणताही दगाफटका होत नाही, तर ही माणसं बिबट्यांना जमिनीचे रक्षक मानतो.

इथली जमीन आणि भौगोलिक वातावरण बिबट्यांसाठी अनुकूल आहे. खडकाळ टेकड्या आणि नैसर्गिक गुहा यांमुळे बिबट्यांचं प्रमाण अधिक आहे. याचबरोबर या बिबट्यांसाठी आजूबाजूला आढळणारे वन्य शिकार अन्न पुरवतात. इथली जमीन आणि वातावरण देखील बिबट्यांसाठी अनुकूल आहे, खडकाळ टेकड्या आणि नैसर्गिक गुहा घर देतात, आणि आजूबाजूला आढळणारे वन्य शिकार त्यांना अन्न पुरवतात.बेडा गाव आता Eco-tourism चे केंद्र बनले आहे, जिथे लोक बिबट्यांना पाहण्यासाठी येतात, पण परत जाताना माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याने प्रेरित होऊन जातात.बेडा गावात बिबट्या आणि माणसांचं एकत्र राहणं ही त्यांच्या जीवनशैलीचा एक सहज भाग आहे. असं हे बेडा गाव जिथे बिबट्याला परमेश्वराचं रुप मानलं जातं आणि गावकरी या बिबट्यांना अभय देतात.

हिवाळ्यात निसर्गाच्या कुशीत भटकंती! कुटुंबासोबत महाराष्ट्र फिरायचं तर या 6 पर्यटन स्थळांना भेट द्यायलाच हवी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: बेडा गाव बिबट्यांसाठी प्रसिद्ध का आहे?

    Ans: कारण या गावात बिबट्या जंगलापुरते मर्यादित नसून थेट गावात, मंदिरांजवळ, शेतात आणि घरांच्या आसपास मुक्तपणे फिरतात.

  • Que: बेडा गावात बिबट्यांचा वावर किती वर्षांपासून आहे?

    Ans: बेडा गावात बिबट्यांचा वावर अनेक पिढ्यांपासून आहे. हा सहवास अचानक निर्माण झालेला नसून पारंपरिक आणि नैसर्गिक आहे.

  • Que: बेडा गाव कुठे आहे?

    Ans: बेडा हे गाव राजस्थान राज्यात अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. हे गाव विशेषतः बिबट्यांच्या मुक्त वावरासाठी ओळखले जाते.

Web Title: Leopards and villagers live freely in beda village of rajasthan without any fear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • Leopard
  • Rajsthan

संबंधित बातम्या

Leopard News: मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत; जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका…
1

Leopard News: मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत; जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका…

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, ग्रामस्थ संतप्त; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना
2

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, ग्रामस्थ संतप्त; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना

Satara: ऊसाच्या शेतात चार पाय कापलेल्या मादी बिबट्याचा सापडला मृतदेह; 18 नखे गायब
3

Satara: ऊसाच्या शेतात चार पाय कापलेल्या मादी बिबट्याचा सापडला मृतदेह; 18 नखे गायब

वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा; बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू
4

वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा; बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.