बारामती तालुक्यातील खांडज, शिरवली व माळेगाव परिसरातील नीर डावा कालवा व नीरा नदी परिसरातील बागायती पट्ट्यात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चाकण वनपरिक्षेत्रातील मर्सिडीज-बेंझ कंपनीच्या प्रकल्प परिसरात शिरलेल्या बिबट्याला अखेर दोन दिवसांच्या थरारक शोधमोहीमेनंतर वन विभागाने रविवारी रात्री जेरबंद केले आहे.
सांगली जिल्ह्यातील जत येथील साखर कारखाना परिसरात बिबट्या दिसल्याच्या चर्चेने खळबळ उडाली. वनविभागाच्या तपासणीत तो प्राणी रानमांजर असल्याचे समोर आले आहे.
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत बिबट्या हा अनुसूची-१ मधील संरक्षित प्राणी असून त्याचे अवयव बाळगणे व विक्री करणे पूर्णतः प्रतिबंधित आहे. संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चंद्रपुरातील ग्रामस्थ अजूनही 'बिबट समस्यामुक्त ग्राम' योजनेची अंमलबजावणी कधी होणार याची प्रतिक्षा करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या 5 वर्षांमध्ये 200 जणांचा मृत्यू झालाचा अहवाल समोर आला आहे.
अजिंठा परिसरातील अंधारी शिवारात ग्रामस्थांनी धाडस दाखवून बिबट्याला जेरबंद केले. वनविभागाने २ तासांच्या कारवाईनंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले असून परिसरातून भीतीचे सावट दूर झाले आहे.
बिऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर पाटील या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली होती. गरीब कुटुंबातील बालकाच्या मृत्यूनंतर नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत तीव्र आंदोलन केले होते.
मानव व पशुधनांवरील हल्ल्यांच्या घटनांनंतर संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित होती.
अहिल्यानगर जिल्ह्यातील वन नर्सरीत जेरबंद केलेल्या बिबट्यांच्या संख्येबाबत वाद निर्माण झाला आहे. वन्यजीव प्रेमी अमित गायकवाड यांनी नर्सरीत तब्बल आठ बिबटे उन्हात ठेवले असल्याचा आरोप केला होता.
सध्या सैतवडा परिसरात भीतीचे सावट असून शेतकरी आणि बागायतदार कामावर जाण्यास धजावत नाहीत, वनविभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Leopard Viral Video : सेलिब्रेशन असं की बिबट्यालाही लाज आणली... सोशल मिडियावर होळी सेलिब्रेशनचा अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात लोकांनी बिबट्याला पकडून त्याला रंग लावत असल्याचे दिसून आले.
ओतूर (ता. जुन्नर) वनपरिक्षेत्रात बिबट्यांच्या वावरामुळे स्थानिक नागरीकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत एकूण १४ बिबटे पकडण्यात आले आहेत.
गावात मोकाट भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे ग्रामस्थ सांगतात. बिबट्याच्या तावडीतून भटक्या श्वानांचीही सुटका होत नसल्याने तो नियमितपणे गावात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मीरा-भाईंदर परिसरातून १९ डिसेंबर रोजी बचाव करण्यात आलेल्या बिबट्याच्या मृत्यूनंतर वनविभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बचावलेल्या बिबट्यांची तपासणी करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
वन विभागाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर २५ डिसेंबर रोजी बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच येऊर वनपरिक्षेत्रातील नागला भागात सोडण्यात आले होते.
अहिल्यानगरच्या खडकी गावात बिबट्यांचे वारंवार दर्शन पाहायला मिळत आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच गावकऱ्यांकडून महावितरणला देखील एक निवेदन देण्यात आले आहेत.