(फोटो सौजन्य – Pinterest)
जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय
जपान देशाच्या ओत्सुकी येथे असा एक टेलिफोन बूथ आहे. हा बूथ कोणत्याही नेटवर्कशी जोडला गेलेला नाही. तरीही तो ‘कार्यरत’ आहे. ज्यांना आपल्या मृत कुटुंबियांशी संपर्क करायचा आहे, असे लोक या बूथवर जातात. त्या बूथवरच्या टेलिफोनमधून आपल्या मृत अशी माहिती दिली जाते. या बूथला ‘द विंड फोन बूथ’ असे संबोधले जाते. ज्यांना आपल्या कुटुंबियांचा मृत्यू असह्या झालेला आहे, असे सहस्रावधी लोक या फोनबूथचा आधार घेतात, असे दिसून आलेले आहे. दुःखी लोक या बूथवर येतात. रिसिव्हर उचलतात आणि आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन देतात. मृत कुटुंबियांशी बोलतात. ते या फोनवर जे बोलतात, ते त्यांच्या मृत कुटुंबियांपर्यंत पोहचते, अशी अनेकांची श्रद्धा आहे.
भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य
आपले मन हलके झाल्याचा अनुभव या फोनवर बोलल्याने येतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. हा बूथ इतारु सासाकी नामक व्यक्तीने त्याच्या मृत चुलत भावाशी संवाद साधण्यासाठी स्थापन केला होते. २०११ च्या महाविनाशकारी सुनामीत अनेक जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी हा फोनबूथ सर्वांच्या उपयोगासाठी मोकळा केला. तेव्हापासून आतापर्यंत ३० सहस्त्रांहून अधिक लोक त्याचा उपयोग केला आहे. आता हा उपाय जगात सर्वत्र पसरत असून अमेरिकेतही असे २०० फोन बूथ स्थापन झाले आहेत.






