फोटो सौजन्य - Social Media
नोकरीधंदा करणाऱ्या माणसाला स्वतःच्या आरोग्यावर आणि स्वतःच्या खाजगी आयुष्यावर लोकध ठवणे कठीण जात असते. अशा मध्ये आपल्या आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे, आरोग्यावर भयंकर परिणाम होतात. याचा परिणाम व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणीदेखील दिसून येतो. बिघडलेली जीवनशैली फक्त माणसाचे आरोग्यच नव्हे तर त्याची कार्यक्षमतादेखील एकदम बिघडवून टाकते. जर तुम्ही ऑफिसला जाणारे असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल कि कामाचे आयुष्य आणि खाजगी आयुष्य यामध्ये समतोलता राखणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. दिवसरात्र कामाच्या विचारात असल्याने जेवणही कमी जात असते. एकंदरीत, कामाचा प्रेशर आपल्या जीवनशैलीला बदलून टाकते तसेच त्यात बिघाड करत असते.
हे देखील वाचा : दुर्मिळ पल्मनरी हायपरटेंशनने पीडित तान्ह्या मुलीवर फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथे यशस्वी उपचार
कामाच्या या व्यस्थ जीवनात आरोग्याला त्रास होणे आणि त्याविषयी सतत चिंता जाणवणे खूप सामान्य गोष्ट आहे. ऑफिसला जाणारे बहुतेक जण याने त्रासले आहेत. परंतु, या त्रासापासून मुक्त होणे सोपे आहे. यासाठी आपली बिघडलेली जीवनशैली पुन्हा रुळावर आणावी लागेल. तरच हे शक्य आहे. आपल्या व्यस्थ जीवनातून थोडा काळ नियमित व्यायामासाठी दिला तर अतिउत्तम! फार वेळ नाही, दिवसातून किमान आर्धा तासासाठी व्यायाम करणे, आपल्या शरीराला अनेक फायद्यांशी भेट घडवून आणू शकते. या आर्धा तासामध्ये तुम्ही व्यायाम किंवा योग करू शकता. तसेच स्वीमिंग करू शकतो, किंवा अगदी चालण्यासही जाऊ शकता.
जर आपला बैठी जॉब असेल तर आपले खाणेपिणे मजबूत हवे. आपण किती खातो यापेक्षा आपण काय खातो? यावर लक्ष देणे फार महत्वाचे आहे. आपल्या सेवनामध्ये हिरव्या भाज्या, फळ, कडधान्याचा समावेश असणे आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. अशामध्ये बाहेरील तळलेले पदार्थ टाळणे फार महत्वाचे आहे. कामाच्या तणावामध्ये किमान ८ ते ९ तास झोप घेणे फार आवश्यक आहे. याने आपले मानसिक स्वास्थ्य शाबूत राहते. या व्यस्थ जीवनामध्ये निदान स्वतःचे मानसिक स्वास्थ्य सुरळीत ठेवण्यासाठी सामायिक व्हा.
कुटुंबाशी किंवा नातेवाईकांशी किंवा आपल्या मित्र बंधूंशी सतत संवाद साधत राहा, जेणेकरून काही गोष्टी आपल्या मनात दाबून राहून आपल्याला त्या गोष्टीचा मानसिक त्रास होणार नाही. आपल्या जीवनशैलीमध्ये हे बदल करून आपण आपले ऑफिससाठी जगत असलेली व्यस्थ आयुष्य अगदी बेफिकीरपणे निरोगी जगू शकतो.